Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी याप्रकारे पूजा करा

भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पुज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. आज संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. सुखी जीवनासाठी या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात. तसेच, हिंदू पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शिवाने आपल्या पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते.

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी याप्रकारे पूजा करा
Ganesh-Chaturthi

मुंबई : भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पुज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. आज संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. सुखी जीवनासाठी या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात. तसेच, हिंदू पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शिवाने आपल्या पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते.

बुधवार असल्याने या संकष्टीचे महत्त्व आणखी वाढले आहे. संकष्टी चतुर्थीचा दिवस प्रत्येक महिन्याच्या दोन्ही चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उपवास बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ठेवला जाईल.

संकष्टी चतुर्थी 2021 : तिथी आणि मुहूर्त

🔶 गोधुली पूजा मुहूर्त – 6: 37 ते 7: 03

🔶 चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी – 4 वाजून 18 मिनिटांपासून सुरु होईल

🔶 चतुर्थी 26 ऑगस्ट रोजी – 5 वाजून 13 मिनिटांनी संपेल

🔶 ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:37 ते 5:11

🔶 अमृत ​​काळ – 3:48 ते 5: 28

🔶 सूर्योदय – सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी

🔶 सूर्यास्त – सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी

संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. त्यांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच गणपतीच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात. म्हणून त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त उपवास करतात. या दिवशी काही मंत्रांचा जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

1. ‘ॐ गं गणपतये नम’ – जीवनात आनंदाचा मंत्र

2. ‘ॐ वक्रतुंडाय हुं’ – संकटं दूर करण्याचा मंत्र

3. ‘ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा’ – सौभाग्य प्राप्त करण्यासाठी मंत्र

संकष्टी चतुर्थी 2021 : पूजा करण्याची पद्धत

💠 सकाळी लवकर उठून गणपतीला पाणी अर्पण करा आणि त्यांची पूजा करा.

💠 दिवसभर उपवास ठेवा, याने सर्व इच्छा पूर्ण होतील असा विश्वास आहे. दिवसा तांदूळ, गहू आणि डाळींचे कोणत्याही स्वरुपात सेवन करणे टाळा.

💠 संध्याकाळी दुर्वा, फुले, अगरबत्ती आणि दिव्याने गणपतीची पूजा करा.

💠 पूजेच्या पूर्ण विधी परंपरेनुसार गणेश मंत्रांचा जप करा.

💠 गणपतीला अत्यंत प्रिय असणारे मोदक आणि लाडू अर्पण करा.

💠 चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

💠 चंद्रोदयानंतर उपवास सोडा. चंद्राचे दर्शन होणे खूप शुभ आहे. म्हणून जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा अर्घ्य अर्पण करा.

💠 मान्यतेनुसार, गणपतीला तुळशी आवडत नव्हती, म्हणून त्यांची पूजा करताना त्यांना तुळशीची पाने कधीही अर्पण करु नका.

संकष्टी चतुर्थी 2021 : महत्त्व

संकष्टीचा संस्कृत अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्ती. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे, या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले. कोणतीही विधी किंवा नवीन उपक्रम सुरु करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्याची ज्ञानाची देवता म्हणूनही पूजा केली जाते आणि ते विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shiva Puja Benefits | सोमवारच्या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा करा, आयुष्यात चमत्कारिक बदल जाणवतील

शनीपीडा रोखण्यासाठी करा हे उपाय, सर्व संकटे होतील दूर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI