शनीपीडा रोखण्यासाठी करा हे उपाय, सर्व संकटे होतील दूर

शनीच्या साडेसातीचे परिणाम केवळ मनुष्यालाच भोगायला लागत आहेत, असे नाही. तर याआधी देव-देवतांनीही शनीच्या परिणामांना तोंड दिलेले आहे. मग प्रभू रामचंद्रांचा वनवास असेल किंवा रावणाचा प्रभू रामचंद्रांकडून झालेला विनाश असेल.

शनीपीडा रोखण्यासाठी करा हे उपाय, सर्व संकटे होतील दूर
शनीपीडा रोखण्यासाठी करा हे उपाय, सर्व संकटे होतील दूर

मुंबई : नवग्रहांमध्ये शनी ग्रहाचे नाव येताच प्रत्येक जण हादरून जातो. मकर आणि कुंभ राशीतील स्वामी शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात जास्त मारक आहे. नवग्रहांमध्ये शनीची चाल सर्वात धिमी आहे. त्यामुळेच कोणाच्या कुंडलीत जर शनी असेल तर त्याचा प्रभाव अधिक काळ पाहायला मिळतो. ज्योतिषानुसार व्यक्तीच्या कर्मांमुळे त्याला फळ मिळते. जर आपल्या मागे शनीची साडेसाती लागली तर त्यातून आपली सहजासहज सुटका होत नाही, असे म्हटले जाते. मग सगळेजण चिंतेत सापडतात आणि वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात करतात. शनीच्या साडेसातीचे परिणाम केवळ मनुष्यालाच भोगायला लागत आहेत, असे नाही. तर याआधी देव-देवतांनीही शनीच्या परिणामांना तोंड दिलेले आहे. मग प्रभू रामचंद्रांचा वनवास असेल किंवा रावणाचा प्रभू रामचंद्रांकडून झालेला विनाश असेल. महाभारतातील पांडवांच्या वनवासालाही शनीच्या साडेसातीचाच परिणाम म्हटले जाते. शनीच्या साडेसातीची सर्वांनाच चिंता आहे. (Take these measures to prevent Saturn, all troubles will be removed)

– जर तुम्हीही शनीच्या साडेसातीमुळे त्रस्त असाल तर प्रत्येक शनिवारी तुमच्या कॉलनीतील सफाई कामगाराला चहाची पत्ती किंवा काही पैसे दान करा. हा उपाय शनीपीडा कमी करेल.

– जर तुम्ही शनीच्या साडेसातीपासून स्वतःचा बचाव करू इच्छित असाल तर तुम्ही कुणाही गरीबाच्या हक्कांवर गदा आणू नका किंवा त्याला कसलाही त्रास देऊ नका.

– शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी दारु तसेच मांसाहार करणे टाळा.

– शनीपीडा दूर करण्यासाठी तसेच शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा उपवास करा. यादिवशी भगवान शिव शंकरांची पूजा करा. हे करताना शिवलिंगावर दूध आणि तीळ अर्पण करा.

– शनीची साडेसाती रोखण्यासाठी शनीदेवाचा खालील मंत्र जपा. त्यामुळे तुमच्यावर शारीरिक, मानसिक, आर्थिक संकट ओढवणार नाहीत.

ॐ शं शनैश्चराय नमः।।
ॐ नमो भगवते शनैश्चराय सूर्यपुत्राय नमः।।
ॐ श्री शनिदेवाय नमो नमः।। (Take these measures to prevent Saturn, all troubles will be removed)

इतर बातम्या

Breaking : खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या! बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी

Kaal Sarp Dosh Remedies : जन्मपत्रिकेत कालसर्प दोष असल्यास अवश्य करा हे उपाय, सर्व समस्या होतील दूर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI