AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती. असे मानले जाते की भगवान गणेश भक्तांच्या समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते.

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व
Lord-Ganesha
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 24, 2021 | 10:06 AM
Share

मुंबई : भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती. असे मानले जाते की भगवान गणेश भक्तांच्या समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते.

यावेळी ती बुधवार 25 ऑगस्ट रोजी पडत आहे. आनंदी जीवनाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात. तसेच, हिंदू पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शिवाने आपल्या पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते.

संकष्टी चतुर्थी 2021 : तिथी आणि मुहूर्त

? गोधुली पूजा मुहूर्त – 6: 37 ते 7: 03

? चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी – 4 वाजून 18 मिनिटांपासून सुरु होईल

? चतुर्थी 26 ऑगस्ट रोजी – 5 वाजून 13 मिनिटांनी संपेल

? ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:37 ते 5:11

? अमृत ​​काळ – 3:48 ते 5: 28

? सूर्योदय – सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी

? सूर्यास्त – सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी

संकष्टी चतुर्थी 2021 : महत्त्व

संकष्टीचा संस्कृत अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्ती. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे, या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले. कोणतीही विधी किंवा नवीन उपक्रम सुरु करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्याची ज्ञानाची देवता म्हणूनही पूजा केली जाते आणि ते विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

संकष्टी चतुर्थी 2021 : पूजा करण्याची पद्धत

? सकाळी लवकर उठून गणपतीला पाणी अर्पण करा आणि त्यांची पूजा करा.

? दिवसभर उपवास ठेवा, याने सर्व इच्छा पूर्ण होतील असा विश्वास आहे. दिवसा तांदूळ, गहू आणि डाळींचे कोणत्याही स्वरुपात सेवन करणे टाळा.

? संध्याकाळी दुर्वा, फुले, अगरबत्ती आणि दिव्याने गणपतीची पूजा करा.

? पूजेच्या पूर्ण विधी परंपरेनुसार गणेश मंत्रांचा जप करा.

? गणपतीला अत्यंत प्रिय असणारे मोदक आणि लाडू अर्पण करा.

? चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

? चंद्रोदयानंतर उपवास सोडा. चंद्राचे दर्शन होणे खूप शुभ आहे. म्हणून जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा अर्घ्य अर्पण करा.

? मान्यतेनुसार, गणपतीला तुळशी आवडत नव्हती, म्हणून त्यांची पूजा करताना त्यांना तुळशीची पाने कधीही अर्पण करु नका.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shiva Puja Benefits | सोमवारच्या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा करा, आयुष्यात चमत्कारिक बदल जाणवतील

Shravan Purnima 2021 : रक्षाबंधनच्या दिवसापासून पुढील 40 दिवसांपर्यंत अष्ट लक्ष्मी मंत्राचा जप, सौभाग्य लाभेल

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला