Yamraj Well : येथे येताच मिळतात मृत्यूचे स्पष्ट संकेत; हाच तो यमराजाचा ‘आड’, हे मंदिर कोणते?

Well Of Yamraj : या शहरातील मंदिरात तुम्ही दाखल होताच तुम्हाला मृत्यूचे संकेत मिळतात. ते तुम्हाला वाचता अथवा लक्षात आले पाहिजे, अशी मान्यता आहे. या ठिकाणी धर्मराज यमराज यांच्याशी संबंधित एक आड, विहीर सुद्धा आहे.

Yamraj Well : येथे येताच मिळतात मृत्यूचे स्पष्ट संकेत; हाच तो यमराजाचा आड, हे मंदिर कोणते?
येथे मिळतात मृत्यूचे स्पष्ट संकेत
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 17, 2025 | 4:00 PM

भारतात अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत. तिथल्या चमत्काराच्या कथांची उजळणी अनेकदा पारावर, मित्रांच्या घोळक्यात होते. काही धार्मिक स्थळांविषयी भाविक भक्तांच्या मनात इतकी श्रद्धा आहे की तिथे विज्ञान थिटे पडते. असेच एक ठिकाण उत्तर प्रदेशातील काशीमध्ये आहे. काशी हे हिंदू धर्मातील मोक्षधाम आहे. अनेक जण या शहरात मृत्यू यावा म्हणून राहत आहेत. त्यात अनेक श्रीमंत लोकांचा पण समावेश आहे. या शहरात मृत्यू झालेला व्यक्ती जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत असल्याची मान्यता आहे. तर या शहरात मणिकर्णिका घाट आणि काशी विश्वनाथ बाबाच्या मंदिराव्यतिरिक्त अजून ए रहस्यमयी मंदिर आहे. यमराजाशी संबंधित या मंदिराचे एक खास वैशिष्ट्ये आहे. या मंदिरात एक खास विहीर, आड आहे. हा आड भक्तांना त्यांच्या मृत्यूचे संकेत देतो, अशी मान्यता आहे.

कुठे आहे यमराजाचे ते मंदिर

तर हे मंदिर काशीमधील मीरघाटाच्या उच्च ठिकाणी स्थित आहे. या मंदिराचे नाव धर्मेश्वर महादेव मंदिर असे आहे. येथे एक विहीर सुद्धा आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या दाव्यानुसार, ही विहीर, आड, गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्यापूर्वीची असल्याचा त्यांचा दावा आहे. ही विहीर सूर्यपूत्र यमराज यांनी बांधल्याचे सांगितले जाते. गंगा अवतरीत होण्यापूर्वी यमराजाने येथे दीर्घ तपस्या केल्याचे मानले जाते.

मिळतात मृत्यूचे संकेत

असी मान्यता आहे की, ही रहस्यमयी विहीर मृत्यूचे संकेत देते. अशी मान्यता आहे की, जर एखाद्या व्यक्तीला या विहिरीत त्याची सावली दिसली नाही तर तो येत्या 6 महिन्यात मरण पावणार, हे निश्चित मानल्या जाते. पुजाऱ्यांच्या मते, अनेक लोकांना त्याचा अनुभव आला आहे. ज्यांना त्यांची सावली या पाण्यात दिसली नाही, त्यांनी याविषयी नातेवाईकांना सांगितले. अनेकांचा अर्थातच त्यावर विश्वास नव्हता. पण काही घटना तशा घडल्याचा दावा करण्यात येतो.

अशी मान्यता आहे की, भगवान शिव आणि यमराज हे या ठिकाणी विराजमान आहेत. धर्मेश्वर महादेव मंदिर फार जूने आहे. तिथली विहीर ही धर्मराजाने बांधल्याची मान्यता आहे. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याअगोदरची ही विहीर आहे. ज्या व्यक्तीला या विहिरीत त्याची सावली दिसत नाही, त्याचा पुढील सहा महिन्यात मृत्यू होतो असे मानल्या जाते.

डिस्क्लेमर: ही धार्मिक मान्यतेनुसार दिलेली माहिती आहे. टीव्ही 9 याविषयीचा कोणताही दावा करत नाही.