AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Warren Buffet : श्रीमंत व्हा! वॉरेन बफे यांचे ते गोल्डन सीक्रेट; या 5 ठिकाणी पैसा खर्च करणे सर्वात मोठी चूक

Warren Buffet Golden Secret : जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी श्रीमंत होण्यासाठी एक राजमार्ग सांगितला आहे. त्यांनी श्रीमंतीसाठी काय काय करावे लागेल याचा मंत्र सांगितला आहे.

Warren Buffet : श्रीमंत व्हा! वॉरेन बफे यांचे ते गोल्डन सीक्रेट; या 5 ठिकाणी पैसा खर्च करणे सर्वात मोठी चूक
श्रीमंतीचे ते नियमImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 17, 2025 | 3:23 PM
Share

Warren Buffett Saving Tips : काळानुरूप जीवनशैली बदलते. सध्याचे युग हे देखाव्याचे मानले जाते. ब्रँडेड कपडे, महागड्या कार, महागडी गॅझेट्स आणि सोशल मीडियावर या आलिशान आयुष्याचे प्रदर्शन मांडण्याची जणू स्पर्धा लागली आहे. अनेक जण या प्रपंचात स्वतःची आहे नाही ती सर्व बचत गमवतात. त्यांचे खर्चावरील नियंत्रण सुटते आणि मग कर्जाचा डोंगर वाढतो. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी श्रीमंत होण्यासाठी एक राजमार्ग सांगितला आहे. त्यांनी श्रीमंतीसाठी काय काय करावे लागेल याचा मंत्र सांगितला आहे.

कार खरेदी म्हणजे पांढरा हत्ती पोसणे

नवीन कार खरेदी ही आर्थिक जोखीम असते. जेव्हा तुम्ही नवीन कार शो-रूममधून खरेदी करून रस्त्यावर चालवता, त्याचवेळी तिची किंमत 20-30 टक्क्यांनी घसरते. पुढे दरवर्षी कारची किंमत कमी होते. पाच वर्षांत तुमच्या कारची किंमत 60 टक्क्यांनी घसरते. बफे यांनी सुद्धा जुन्या कारची खरेदी केली आहे.

क्रेडिट कार्डचे मायाजाल

क्रेडिट कार्ड हे तर मोठे मायाजाल आहे. त्याचा वापर अत्यंत सावधगिरीने करण्याचा सल्ला बफे यांनी दिला आहे. भारतात क्रेडिट कार्डवरील वार्षिक व्याजाचा अंदाज बांधला तर तुमचे डोळे विस्फारतील. त्यात जर तुम्ही क्रेडिट कार्डचे हप्ते भरले नाही तर लवकरच तुमचे दिवाळे निघालेच म्हणून समजा. ही सर्वात घातक सावकारी मानल्या जाते.

लॉटरी-जुगाराचे व्यसन नको रे भावा

झटपट श्रीमंतीचा हव्यास माणसाला तितक्याच झटपट रसातळाला नेतो. विनासायास पैसा मिळवण्याचा हट्ट अनेकांना लॉटरी आणि जुगाराच्या व्यसनात अडकवतो. छोट्या-छोट्या रक्कमा लक्षात येत नाही आणि श्रीमंत होण्याची ही हौस कर्जाच्या मार्गावर नेतो.

गरजेपेक्षा मोठ्या घराची खरेदी

तुमच्या गरजेपेक्षा मोठ्या घराची खरेदी आणि सजावटीवरील खर्च तुमचे नुकसान करू शकतो. बफे यांनी 1958 मध्ये साधारण घर खरेदी केले होते. त्यांनी अतिरिक्त खर्चही केला नाही. तुमची गरज जर 2BHK असेल तर 4BHK घर खरेदी करणे हा वेडेपणा ठरेल.

बडेजावपणासाठी खरेदी मूर्खपणाची

केवळ कुणाला दाखवण्यासाठी, टेंभा मिरवण्यासाठी, बडेजावपणासाठी कोणत्याही वस्तूची खरेदी मूर्खपणा ठरतो. ईर्ष्या, दांभिकता या अवगुणासाठी तुम्ही काही वस्तू अव्वाच्या सव्वा किंमतीला खरेदी करत असाल तर त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....