स्वप्नात शत्रूला Kiss करण्याचा काय निघतो अर्थ? काय सांगतं स्वप्नशास्त्र? जाणून घ्या

आपण झोपल्यानंतर अनेकदा आपल्याला चित्रविचित्र स्वप्न पडतात. काही स्वप्न तर झोप उडवणारी असतात. त्यामुळे त्याचा अंदाज बांधणं कठीण असतं. स्वप्नशास्त्रात काही स्वप्नाचे अर्थ सांगण्यात आले आहेत. यात शत्रूला किस करण्याचं कारणही सांगण्यात आलं आहे.

स्वप्नात शत्रूला Kiss करण्याचा काय निघतो अर्थ? काय सांगतं स्वप्नशास्त्र? जाणून घ्या
| Updated on: Jan 26, 2025 | 8:26 PM

शांत झोप झाल्यानंतर आपल्याला चांगल्या वाईट स्वप्नांची अनुभूती येते. अनेकदा आपण रोज करत असलेल्या घडामोडी आपल्या समोर येतात. त्यामुळे तो आपल्या जीवनाचा भाग आहे अशीच समज असते. काही स्वप्न आपल्याला आनंद देतात, तर काही स्वप्नांमुळे आपल्या दु:ख होतं. काही स्वप्न तर विचार करण्यास भाग पाडतात. काही स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सांगितला गेला आहे. स्वप्नात किस (Kiss) केल्याचं दिसलं तर त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. त्यातही शत्रूला किस घेतलं तर काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. किसचे अनेक अर्धस आहे. स्वप्नात आपल्या जोडीदारारा किस केलं तर त्याचा अर्थ आपण प्रेम व्यक्त करत असतो. एकदुसऱ्यांप्रती असलेलं आकर्षण यातून प्रतित होतं. दुसरीकडे, जोडीदाराने किस करण्यास नकार दिला तर त्याचा अर्थ नात्यात दूरावा असल्याचं दर्शवतं. पण स्वप्नात अनोळखी व्यक्तीला किस केल्याचं दिसलं. तर स्वप्नशास्त्रानुसार समजून जा की, तुम्ही आयुष्यात नव्या गोष्टी शोधण्यासाठी उत्सुक आहात. नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा यामुळे मिळते.

तुम्ही स्वप्नात तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाला किस करताना पाहता तेव्हा तुमच्या आयुष्यात नवी लोकं येणार आहेत. तसेच नव्या लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील असे संकेत असतात. तर तुम्ही स्वप्नात आणखी कोणाला तरी किस करताना पाहिलं तर खऱ्या आयुष्यात कोणतातरी करार पक्का होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागू शकतात. त्याचबरोबर स्वप्नात आई वडिलांना किस करताना पाहिलं तर तुम्ही नशिबवान आहात, असा अर्थ निघतो. आई वडिलांप्रती प्रेम आणि त्यांची चिंता असल्याचं दिसून येते. तुम्ही आईवडिलांवर नितांत प्रेम करता हे दिसतं.

तुम्ही स्वप्नात शत्रुला किस केलं तर त्याचा विरुद्ध स्वभाव असल्याचे प्रतिबिंबित करते. आपण स्वत: ला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहात की आपल्याला कोणीही आवडत नाही. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीबद्दल आपल्याला निश्चितपणे काही तरी आकर्षण आहे, असं प्रतित होतं. दुसरीकडे, स्वप्नात मित्राल किस करण्याचा अर्थ असा की, तुम्हाला त्याच्या प्रति आकर्षण आहे किंवा त्याच्याशी वादही होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)