Mangal Dosha: कुंडलीत मंगळ ग्रह कडक असल्यानंतर झाडाशी विवाह का केला जातो? जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक कुटुंब कुंडली पाहून लग्न करायचा की नाही याबाबत निर्णय घेतात. किती गुण जुळतात, इथपासून मंगळाची स्थिती काय आहे हे पाहीलं जातं. कुंडलीत मंगळ दोष असेल तर झाडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला जातो. असं का सांगितलं जातं ते समजून घ्या.

Mangal Dosha: कुंडलीत मंगळ ग्रह कडक असल्यानंतर झाडाशी विवाह का केला जातो? जाणून घ्या
मंगळ दोष
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 12, 2025 | 8:13 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, लग्न करण्यापूर्वी मंगळाची स्थितीचा अभ्यास केला जातो. मंगळ ग्रह कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात असेल तर व्यक्तीला मंगळ दोष असल्याचं मानलं जातं. मंगळ असलेल्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे मंगळ दोष असलेल्या व्यक्तीशी विवाह करण्यापूर्वी एक भीती असते. कुंडलीत मंगळ दोष असला तर घाबरण्याचं कारण नाही. कारण ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. मंगळ दोषाच्या निवारणासाठी अनेक मान्यता आणि प्रथा आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, मंगळ दोष असलेल्या व्यक्तीला लग्नानंतर सुखी जीवन जगायचं असेल तर पहिल्यांदा झाडाशी लग्न करावं लागतं. मंगळ असलेल्या व्यक्तीचा झाडाशी लग्न लावण्याच्या विधीला कुंभ विवाह किंवा वट वृक्ष विवाह बोललं जातं. कुंभ विवाह केल्याने मंगळ दोषाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. मपण तुम्हाला माहिती आहे का? मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह झाडाशीच का केला जातो? चला जाणून घेऊयात..

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह मंगळ नसलेल्या व्यक्तीसोबत केल्याने अकाली मृत्यूचं कारण ठरू शकतो. अशी स्थिती रोखण्यासाठी मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचं झाडाशी (केळं, वड किंवा पिंपल), मडकं, शालिग्राम किंवा निर्जीव वस्तूंशी लग्न लावून दिलं जातं. ज्योतिषशास्त्रात मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी कुंभ विवाह आवश्यक आहे. व्यक्तीच्या जन्म कुंडली आणि प्रकृतीचा थेट संबध असतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हिंदू धर्मात अनेक वृक्षांची पूजा केली जाते. यामुळे ग्रहांचे दोष सौम्य होतात. त्यामुळे मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचा झाडाशी विवाह करण्याची प्रथा खूप जुनी आहे.

व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास लग्नापूर्वी आंबा, पिंपळ, वड यासारख्या झाडांसोबत विवाह केला जातो. यामुळे मंगळ दोष संपतो. मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचा झाडाशी विवाह करताना झाडाची पूजा केली जाते आणि झाडाला कुंकू लावलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, असं केल्याने मंगळ दोष दूर होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)