फायदेच फायदे असलेला Jio चा हॅपी न्यू इयरचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, जाणून घ्या
रिलायन्स जिओने हॅपी न्यू इयर प्लॅन 2026 लाँच केला आहे. या नवीन प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त कमी किमतीत 10 हून अधिक ओटीटी ॲप्सचा मोफत प्रवेश मिळतो. शिवाय, या प्लॅनमध्ये इतर अनेक फायदे देखील मिळतात. चला तर मग या स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

मुकेश अंबानी यांची असलेली रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने त्यांच्या लाखो वापरकर्त्यांसाठी 500 रूपये किमतीचा नवीन हॅपी न्यू इयर 2026 प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, व्हॉइस आणि ओटीटी सबस्क्रिप्शनचा मोफत वापर करता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला किती जीबी डेटा आणि कोणत्या ओटीटी ॲप्सचा फायदा होईल? त्यासोबत आणखीन कोणकोणते फायदे मिळणार आहे चला आजच्या लेखात जाणून घेऊयात.
जिओ 500 रूपयांच्या प्लॅनची वैधता
हा 500 रुपयांचा जिओ प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. याव्यतिरिक्त, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. 28 दिवसांच्या वैधतेसह आणि दररोज 2 जीबी डेटासह, हा प्लॅन एकूण 56 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. 5 जी फोन असलेल्या आणि जिओच्या 5 जी नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांनाही या प्लॅनचा फायदा होईल, जो अमर्यादित 5 जी डेटा देखील देतो.
जिओ ओटीटी प्लॅन: तुम्हाला अनेक ओटीटी फायदे मिळतील
जर तुम्ही ओटीटीचे चाहते असाल, तर तुम्हाला रिलायन्स जिओचा हा नवीन प्लॅन आवडेल, कारण तो फक्त एकच नाही तर अनेक ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस देतो. या नवीन 500 च्या जिओ प्लॅनसह, प्रीपेड वापरकर्त्यांना Amazon Prime Video Mobile Edition, YouTube Premium, JioHotstar (Mobile/TV), Zee5, Discovery+, Sony Liv, Sun NXT, Planet Marathi, Lionsgate Play, Chaupal, FanCode आणि Hoichoi सारख्या ॲप्सचा ॲक्सेस मिळेल.
जिओ जेमिनी ऑफर
जिओ 18 वर्षे आणि त्यावरील वापरकर्त्यांना 35,100 रुपयांचा 18 महिन्यांचा मोफत गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील देत आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये 50 जीबी मोफत जिओ एआयक्लाउड स्टोरेज, जिओ फायनान्सद्वारे जिओ गोल्डवर 1% अतिरिक्त सूट आणि नवीन कनेक्शनसह दोन महिन्यांची मोफत जिओहोम ट्रायल समाविष्ट आहे. जर तुम्हाला या प्लॅनची मुदत संपल्यानंतर जेमिनी वापरणे सुरू ठेवायचे असेल, तर तुम्हाला किमान 349 रूपये किमतीचा प्लॅन खरेदी करावा लागेल.
