Astrology 2025 : 15 जूनला सूर्य करणार मिथुन राशीत प्रवेश, या पाच राशींचं महिनाभरासाठी होणार भलं
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव 15 जूनला राशी बदल करणार आहेत. या गोचराला मिथुन संक्रांती असं संबोधलं जातं. या गोचरामुळे पाच राशींचं भलं होऊ शकतं. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते...

ग्रहमंडळात सूर्यदेवांना राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सर्वच ग्रह सूर्याच्या अधिपत्याखाली कार्य नेमून दिलेलं आहे. सूर्यदेव महिनाभरानंतर राशी बदल करत असतात. सूर्याच्या गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. सध्या सूर्यदेव वृषभ राशीत विराजमान असून 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याने मिथुन राशीत प्रवेश करताच काही राशींचं भलं होणार आहे. सूर्यदेव 15 जूनला सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील. या राशीत आधीच गुरु आणि बुध ग्रह विराजमाना आहे. यामुळे मिथुन राशीत त्रिग्रही योग तयार होईल. तसेच प्रत्येक राशीतील स्थान बदलणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम होणार आहे. काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींच्या या कालावधीत त्रास सहन करावा लागणार आहे. सकारात्मक प्रभाव असलेल्या राशीच्या लोकांना करिअर, सामाजिक संबंध आणि आर्थिक स्थितीत फरक दिसून येईल. चला जाणून घेऊयात या राशींबाबत..
या पाच राशींचं होणार भलं
मिथुन : सूर्यदेव या राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील. समाजात मानसन्मान मिळेल. यावेळी आपल्या शब्दाला मान असेल. आपण जे बोलू ती पूर्व दिशा समजून अनेक जण कामाला लागतील.
सिंह : या राशीच्या एकादश स्थानात सूर्यदेव प्रवेश करणार आहेत. त्रिग्रही योगाचा या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. करिअर आणि उद्योगधंद्यात लाभ मिळेल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते.
तूळ : या राशीच्या नवव्या स्थानात सूर्याच्या गोचरासह त्रिग्रही योग तयार होत आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ मिळेल. सोशल मीडियावरून नव्या लोकांशी संपर्क होऊ शकतो.
धनु : या राशीच्या सातव्या स्थानात सूर्यदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे वैवाहिक आयुष्य आणि भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते.
कुंभ : या राशीच्या पाचव्या स्थानात सूर्याच्या गोचरामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात एका महिन्यासाठी दिलासा मिळणार आहे. कौटुंबिक पातळीवर साथ मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)