AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : नरेंद्र मोदी आणि शहांनी केजरीवालांची माफी मागावी- संजय राऊत

| Edited By: | Updated on: Feb 28, 2026 | 10:14 AM
Share

Maharashtra News LIVE Updates : अजिच पवार यांच्या विमान अपघातासंबंधी प्राथमिक तपासाचा अहवाल आज येणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या अहवालाकडे लागलं आहे. यासहे देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपेड्टस दिवसभर या ब्लॉगमध्ये वाचता येतील.

Maharashtra News LIVE : नरेंद्र मोदी आणि शहांनी केजरीवालांची माफी मागावी- संजय राऊत

LIVE NEWS & UPDATES

  • 28 Feb 2026 10:11 AM (IST)

    संजय राऊत यांचे अत्यंत मोठे विधान

    नरेंद्र मोदी आणि शहा यांनी अरविंद केजरीवाल यांची माफी मागावी, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.

  • 28 Feb 2026 10:04 AM (IST)

    शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान मद्यपान करून राजकीय भाषण, धक्कादायक प्रकार

    बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे यांनी मद्यपान करून राजकीय भाषण केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्हिडिओ पुराव्यांसह केली आहे. तर शिस्तभंग आणि निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.

  • 28 Feb 2026 10:00 AM (IST)

    सुप्रिया सुळे ब्रीच कँडी रुग्णालयात , शरद पवारांची प्रकृती कशी ?

    सुप्रिया सुळे ब्रीच कँडी रुग्णालयात आल्या आहेत. शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 28 Feb 2026 09:52 AM (IST)

    वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामावेळी लोखंडी रॉड कोसळला, 1 जखमी

    वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामावेळी लोखंडी रॉड कोसळून 1 जण जखमी झाला आहे.  केईएम हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातात 1 व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून त्याच्या डोक्याला बराच मार लागला आहे.

  • 28 Feb 2026 09:38 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – वृक्षतोडीस तोडीस पर्यावरण प्रेमीचा कडाडून विरोध

    छत्रपती संभाजीनगर – गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी झाडांची कत्तल होणार आहे. गरवारे स्टेडियम येथील 75 झाडे तोडण्यासाठी महानगरपालिकेने प्राधिकरण समितीकडे प्रस्ताव सादर केला होता.  मात्र या वृक्षतोडीस पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध दर्शवला आहे.  महानगरपालिकेच्या विरोधात वृक्ष प्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • 28 Feb 2026 09:12 AM (IST)

    भुसावळ – डोक्यात झाडाची कुंडी मारून एकाची हत्या….

    डोक्यात झाडाची कुंडी मारून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळच्या आनंदनगर नेपा कॉलनीत घडली. किरकोळ शाब्दिक कारणातून अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकार ( वय 25) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळ हादरलं.

  • 28 Feb 2026 09:00 AM (IST)

    पुणे – निलेश घायवळच्या साथीदाराला अटक

    पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीशी संबंधित आणि मकोका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात यश ालं आहे.  वारजे माळवाडी पोलिसांनी अमोल दत्तात्रय लाखे (वय 27 ) याला अटक करत बेड्या ठोकल्या.

  • 28 Feb 2026 08:57 AM (IST)

    डोंबिवली PNT कॉलनीत भीषण पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा KDMC मुख्यालयावर मोर्चा

    डोंबिवली PNT कॉलनीत भीषण पाणीटंचाई आहे. ‘टँकर नको, हक्काचं पाणी द्या’ म्हणत संतप्त नागरिकांनी KDMC मुख्यालयावर मोर्चा काढला.  निवडणुकीत धोधो पाणी, आता कोरडे नळ; टँकरच्या पाण्यावर जीव, कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ठाम मागणी करण्यात आली. उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन आज 1 महीना पूर्ण झाला आहे. या अपघातासंबधी करण्यात आलेल्या तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता असून अपघाताच नेमकं कारण समोर येऊ शकतं. तर 2 मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, रोहित पवार हे याप्रकरणी नवीन खुलासे करणार आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या माजी वैद्यकीय अधीक्षका डॉ. तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अपघातास जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कथितपणे बदलल्याच्या आरोपाखाली तावडे याला अटक झाली होती. निलेश घायवळ टोळीशी संबंधित आणि मकोका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आलं. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Feb 28,2026 8:55 AM

Follow Us
गुन्हा का दाखल होत नाही? पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचे परखड प्रश्न
गुन्हा का दाखल होत नाही? पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचे परखड प्रश्न.
ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?
ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?.
काकींशी स्टेजवर सांभाळून वागा! रोहित पवारांचा इशारा
काकींशी स्टेजवर सांभाळून वागा! रोहित पवारांचा इशारा.
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.