साप चावल्यानंतर का नाही करत व्यक्तीचे अंत्यसंस्कार? मृत व्यक्तीच्या शरीरासोबत घडतात या गोष्टी
बऱ्याचदा अनेकांना साप चावतात, पण तुम्हाला माहिती आहे का की साप चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.... त्या मृत व्यक्तीच्या शरीरासोबत काय होतं... घ्या जाणून...

सापाचं नाव ऐकताच भीती वाटते…. पण आता ही एक सामान्य गोष्ट झाली. आजच्या घडीला विज्ञानाने प्रगती केली आहे. पण साप चावल्यानंतर काय? याबद्दल काही रुढी अशा आहेत, ज्यामुळे अनेकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. आपल्या हिदू धर्मात मृत्यूबद्दल अनेक समज आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, तेव्हा त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात. त्या व्यक्तीला अग्नि दिला जातो नाही तर, जमीनात पुरलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे पूर्वी साप चावल्याने मृत्या झाल्यास काय करायचे? मृतदेहासोबत काय केलं जायचं… तर आज जाणून घेवू पूर्वी साप चावल्यानंतर काय व्हायचं…
सांगायचं झालं तर, भारतात सापांची पूजा केली जाते. याबाबत अनेक मान्यता देखील आहेत. साप आणि भगवान शंकर यांचा थेट संबंध असल्यामुळे सापाची देखील पूजा केली जाते. ज्यामुळे सापाबद्दल देखील अनेक मान्यता आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू होतो तेव्हा गावांमध्ये आणि काही भागात असं मानलं जातं की, ती व्यक्ती पूर्णपणे मेली नाही.
मृत व्यक्तीच्या शरीरासोबत काय केलं जातं…
लोकांचा असा विश्वास आहे की जर योग्य वेळी योग्य उपाय केला तर ती व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते. यामुळे, मृतदेह जाळला जात नाही किंवा मातीत पुरला जात नाही. अशा मृत्यूच्या बाबतीत, मृतदेह नदीत फेकून दिला जातो.
काय आहे कारण?
सांगायचं झालं तर, यामागे अनेक कारणं सांगितली जातात. पूर्वीच्या काळात, काही लोक विशेष मंत्र आणि औषधी वनस्पतींद्वारे सापाच्या विषाचा प्रभाव दूर करू शकत होते. नदी किनारी राहणारे लोकं मृतदेहांना पाहायचे आणि ते पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करायचे. काही मान्यतेनुसार, पाण्यात गेल्याने शरीरातील विष बाहेर पडते. म्हणून, मृतदेह पाण्यात तरंगवणे ही ती व्यक्ती पुन्हा जिवंत होण्याची आणखी एक शक्यता मानली जात होती…
हिंदू धर्मात सापाचं महत्त्व…
भगवान शंकर आपल्या गळ्यात नागराज वासुकीला धारण करतात. याचा अर्थ आहे की ते मृत्यू, भय आणि वासना यांवर विजय मिळवलेला आहे. साप हा त्यांच्या तांडव नृत्यातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हिंदू धर्मात साप फक्त एक जीव नाही, तर एक दैवी, आध्यात्मिक व पौराणिक प्रतिमा आहे. म्हणूनच त्याचा आदर आणि पूजेला विशेष महत्त्व आहे.
