दिवसभर शुटिंग, रात्री हॉटेलात झोपायला गेला, सकाळी डेडबॉडीच आली, प्रसिद्ध अभिनेत्याचा अचानक मृत्यू, काय घडलं?
रात्री हॉटेलमध्ये झोपायला गेलेल्या अभिनेत्याचा मृत्यू, सकाळी हॉटेलच्या खोलीतून बाहेर आला अभिनेत्याचा मृतदेह... नक्की घडलं तरी काय? अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… आता आनंदी असलेला माणूस पुढच्या क्षणाला आपल्यासोबत असेल की नाही… याची काहीही शास्वती नाही… आत देखील असंच काही झालं आहे. अभिनेता रात्री झोपायला हॉटेलच्या खोलीत गेला आणि सकाळी त्याता मृतदेह बाहेर आला. अभिनेत्याचं अचानक निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवस यांचं निधन झालं आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी संध्याकाळी कोचीमधील छोटानीक्कारा येथील एका हॉटेलमध्ये हा अभिनेता मृतावस्थेत आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हॉटेल अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर कलाभवन यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषीत केलं. कलाभवन यांचं निधन कसं झालं याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्याचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झालं असावं… असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काय आहे अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण?
मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी कलामसेरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शनिवारी शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतर, कलाभवन यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवला जाईल. सध्या कलाभवन यांचा मृतदेह छोटनीक्कारा येथील एसडी टाटा रुग्णालयात आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
अभिनेता आगामी ‘प्रकंबनम’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी हॉटेलमध्ये थांबला होता. शुक्रवारी संध्याकाळी, अभिनेता नियोजित वेळेवर चेक-आउटसाठी रिसेप्शनवर आला नाही तेव्हा कर्मचाऱ्यांना अभिनेता खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांना त्यांच्या खोलीत कोणतीही संशयास्पद परिस्थिती आढळली नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
कलाभवन नवस यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चैतन्यम’ सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये विनोदीभूमिका साकारली. आता त्यांच्या अचानक निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
