
Antim Sanskar: जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू एक दिवस होणार… हे निश्चित होणार. मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीवर अंत्यविधी केल्या जातात. सांगायचं झालं तर, आपल्या आयुष्यात अशी अनेक लोकं असतात, जे आपल्याला प्रचंड आवडतात… ज्यांच्यावर आपण प्रेम करतो… पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला देखील दुःख पोहोचतं… पण त्या व्यक्तीला अखेरचा निरोप द्यावाच लागतो… अखेरचा निरोप दिल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला पुन्हा कधीच दिसत नाही… कारण त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. हिंदू धर्मातील गरुड पुराणात याचं महत्त्व देखील सांगण्यात आलेलं आहे.
सांगायचं झालं तर, गरुड पुराणात अंत्यसंस्कारांबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांचं पालन करणं देखील खूप महत्वाचं आहे. गरुड पुराणानुसार, हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर कधीही अंत्यसंस्कार केले जात नाहीत. तर त्या मागील कारण काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊ…
असं मानलं जातं की, सनातन धर्मातील कोणत्याच व्यक्तीचे अंतिम संस्कार कधीही रात्री केले जात नाहीत. वास्तविक, हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कारांचा उल्लेख आहे. जिथे मृतदेहाचे विधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात आणि देहाला अग्नि दिला जातो…
असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर स्वर्गाचे दरवाजे बंद होतात आणि नरकाचे दरवाजे उघडतात. अशा परिस्थितीत मृत आत्म्याला नरकात जावं लागू शकतं. म्हणून हिंदू धर्मात कधीच रात्री अंत्यसंस्कार केले जात नाहीत… असं गरुड पुराणात म्हटलं आहे.
असंही मानलं जातं की, जोपर्यंत मृतदेहाचे अंतिम संस्कार होत नाहीत तोपर्यंत आत्मा शरीरात फिरत राहतो. याशिवाय, रात्रीच्या वेळी अंतिम संस्कार केल्याने पुढील जन्मात व्यक्तीच्या शरीराच्या भागात कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ शकतो. म्हणून, जर संध्याकाळी किंवा रात्री उशिरा मृत्यू झाला असेल तर, सूर्योदयानंतरच त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात.
गरुड पुराणानुसार, स्त्रीला अंत्यसंस्कार चिता पेटवण्याचा अधिकार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर, फक्त त्याचा मुलगा, पुतण्या, पती किंवा वडीलच मृतदेहावर अंत्यसंस्कार करु शकतात. महिलांना अंतिम संस्कार करण्याचा अधिकार नसतो, कारण त्या दुसऱ्या घरच्या असतात आणि आणि वंश पुढे नेण्याची जबाबदारी केवळ मुलावर असल्याने महिलांना अंतिम संस्कार करण्याचा अधिकार नसतो… अशी देखील मान्यता आहे…
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)