
सनातन धर्मात नियमित पूजा करणे आवश्यक मानले जाते. काहीजण नियमित मंदिरात जातात तर काहीजण वारानुसार. तसेच प्रत्येकाची भक्ती अन् पूजा करण्याची पद्धतही वेगळी असते. काही लोक पूर्ण शिस्त आणि विधींनी पूजा करतात. तर काही जण फक्त हात जोडून प्रार्थना करतात. पण श्रद्धा आणि भक्ती यामुळे आयुष्यातील अडचणी कमी होतात. कारण पूजा करताना फक्त हेतू शुद्ध मानला जातो. जर मन स्वच्छ असेल तर सर्व काही बरोबर आहे.
देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर पाय धुवू नयेत
दरम्यान वास्तुशास्त्रात काही नियम आहेत जे मंदिरात जाताना आणि मंदिरातून परतताना लक्षात ठेवले पाहिजेत. असाच एक नियम आहे तो म्हणजे मंदिरातून परतल्यानंतर हातपाय धुणे. शास्त्रातल्या नियमाप्रमाणे मंदिरात जाण्याआधी पाय धुणे महत्त्वाचे असते तर मंदिरातून देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर पाय धुवू नयेत असे म्हटले जाते. त्यामागे काही कारणे सांगितली आहेत.
हातपाय धुणे योग्य आहे का?
शास्त्रांनुसार, दर्शन घेण्यापूर्वी मंदिरात जाऊन पाय धुणे योग्य आहे कारण आपण रस्त्याने येताना कधीकधी अशा ऊर्जा सोबत घेऊन येतो किंवा ज्या लोकांचा ओरा फारच नकारात्मक असतो अशी लोक वाटेत भेटतात त्यामुळे आपल्या एनर्जीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मंदिरात जाण्याआधी त्याच्या आसपास पाण्याचा स्त्रोत असेल तर नक्कीच हात-पाय धुवून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण शांत मनाने देवतेचे स्मरण करू शकतो.
मंदिरातून परतल्यानंतर हातपाय का धुवू नये?
काही लोक मंदिरातून परतल्यानंतर सवयी प्रमाणे हातपाय धुतात. शास्त्रांमध्ये हे योग्य मानले जात नाही. जेव्हा आपण मंदिरातून घरी परततो तेव्हा आपण त्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर ठिकाणाची सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत घरी आणतो. अशा परिस्थितीत, जेव्हा हातपाय धुतले जातात तेव्हा ही ऊर्जा खराब होते किंवा पूर्णपणे नष्ट होते. मंदिरातून परतल्यानंतर, हातपाय लगेच धुण्याऐवजी, काही वेळाने ते धुवावेत.
या गोष्टीही लक्षात ठेवा
शास्त्रांनुसार, मंदिरातून परतताना आपण काही इतर गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही लोक मंदिरातून परतल्यानंतर दुसरीकडे जातात. त्याऐवजी, तुम्ही घरी परत यावे आणि थोडा वेळ शांत राहावे. जर तुम्ही मंदिरातील शिवलिंगाला पाणी अर्पण केले असेल तर रिकामे भांडे घरी आणू नका. मंदिरातूनच थोडेसे पाणी त्यात भरा. घरी परतल्यानंतर ते प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)