
आपण असे अनेकदा ऐकलं असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडून जाऊ नये. घरातल्या मोठ्यांना हे सांगताना आपण हे नेहमी ऐकलं असेल. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की झोपलेल्या व्यक्तीवरून जाऊ नये, म्हणजेच त्यांना ओलांडून जाऊ नये. वडीलधारी लोक झोपलेल्या लोकांना ओलांडून जाऊ नये असा सल्ला देतात. याची अनेक कारणे आहेत. यातीस एक कराण म्हणजे असे केल्याने व्यक्तीची उंची वाढण्यास अडथळा येतो. असं म्हटलं जातं. तर असे करणे अशुभ मानले जाते. यामागील कारण महाभारतातील एका घटनेशी संबंधित आहे.
झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून न जाण्याचं महाभारताशी संबंधीत असलेलं कारण
महाभारतातील एका घटनेनुसार, एकदा भीम युद्धाला जात असताना, हनुमानजींनी एका म्हाताऱ्या माकडाचा वेष धारण केला आणि भीमाचा मार्ग रोखण्यासाठी रस्त्यावर झोपले. त्यांची शेपटी संपूर्ण मार्ग अडवत होती. जेव्हा भीम त्या मार्गावरून जात होता तेव्हा त्यांनी शेपटी ओलांडली नाही तर हनुमानजींना ती काढण्यास सांगितले. तथापि, कमकुवतपणामुळे भगवान हनुमानाने शेपटी काढण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ती ओलांडण्यास सांगितले. भीमाने तसे केले नाही. भीम म्हणाला की या जगातील प्रत्येक जीवात देवाचा एक अंश आहे आणि म्हणूनच, कोणत्याही जीवाला ओलांडणे म्हणजे देवाचा अनादर करण्यासारखे आहे.
भीमाने सांगितलेलं कारण
म्हणून, भीमाने हनुमानजींची शेपटी न ओलांडता ती शेपटी स्वतःच बाजूला काढण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा सर्व शक्ती वापरूनही भीम हनुमानजींची शेपटी हलवू शकला नाही, तेव्हा त्याला कळले की हे काही सामान्य माकड नाही. त्यानंतर हनुमानजींनी भीमाला स्वतःचे खरे रुप दाखवले. त्यांचे महाकाय रूप पाहून नक्कीच भीमही पाहतच राहीला. हनुमानजींनीही भीमाला युद्धात विजयाचे आशीर्वाद दिले.
देवाचा अनादर करण्यासारखे
म्हणूनच झोपलेल्या व्यक्तीला ओलांडू नये असे म्हटले जाते. भीमाने भगवान हनुमानाला ओलांडू नये यासाठी दिलेले कारण लक्षात घेऊन म्हणजे कोणाला ओलांडणे म्हणजे देवाचा अनादर करण्यासारखे असल्याने तसं करणे टाळावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)