एक ओव्हरमध्ये 36 नव्हे तब्बल 43 धावा!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

मुंबई: प्रत्येक बॉलवर सिक्सर ठोकला तरी एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 36 धावा होतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला आहे. एका ओव्हरमध्ये तब्बल 43 धावा ठोकण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडमधील हॅमिल्टन इथल्या सेडॉन पार्क मैदानात हा विश्वविक्रम नोंदवला गेला. न्यूझीलंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ‘द फोर्ड ट्रॉफी’ स्पर्धा सुरु आहे. यामध्ये […]

एक ओव्हरमध्ये 36 नव्हे तब्बल 43 धावा!
Follow us on

मुंबई: प्रत्येक बॉलवर सिक्सर ठोकला तरी एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 36 धावा होतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला आहे. एका ओव्हरमध्ये तब्बल 43 धावा ठोकण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडमधील हॅमिल्टन इथल्या सेडॉन पार्क मैदानात हा विश्वविक्रम नोंदवला गेला.

न्यूझीलंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ‘द फोर्ड ट्रॉफी’ स्पर्धा सुरु आहे. यामध्ये नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स यांच्यातील वन डे सामन्यात एका षटकात 43 धावा ठोकण्याचा पराक्रम झाला.

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सकडून खेळणाऱ्या ज्यो कार्टर (नाबाद 102) आणि ब्रेट हॅप्टन (95) यांनी विल्यम लुडिकच्या एका षटकात (4, 6+nb, 6+nb, 6, 1, 6, 6, 6)  6 षटकार, 1 चौकार आणि 1 धावा अशा 41 आणि 2 धावा नो बॉलच्या अशा एकूण 43 धावा केल्या.

यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम एल्टन चिगुंबुराच्या नावावर होता. त्याने 2013 मध्ये ढाका प्रीमियर डिव्हिजन स्पर्धेत, शेख जमाल क्लबकडून खेळताना अलाउद्दीन बाबूच्या ओव्हरमध्ये 39 धावा (nb5, w1, 6, 4, 6, 4, 6, w1, 6)  केल्या होत्या. तो विक्रम आता मोडित निघाला आहे.

 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा-

43 धावा – ज्यो कार्टर/ ब्रेट हॅप्टन (गोलंदाज -विल्यम लुडिक) – हॅमिल्टन 2018/19

39 धावा- एल्टन चिगुंबुरा (गोलंदाज – अलाउद्दीन बाबू) – ढाका – 2013/14

37 धावा – जे पी ड्युमिनी (गोलंदाज- एडी ली), केपटाईन 2017/18

लिस्ट ए क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय वन डे व्यतिरिक्त विविध देशांतर्गत स्पर्धांचा समावेश होतो. तसं पाहता आंतरराष्ट्रीय सामनेही लिस्ट ए अंतर्गत येतात, मात्र त्या त्या संघांना आंतरराष्ट्रीय दर्जा असावा लागतो. लिस्ट ए नुसार 40 ते 60 षटकांचा सामना असू शकतो.