भारतासाठी फक्त 10 मॅच खेळला पण आज क्रिकेटमध्ये वेगळी ओळख, महिना 60 हजार पेन्शन, 70 कोटीचा मालक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार यश मिळालं नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा डोंगर रचला. तो इंटरनॅशनल लेवलला काही खास करु शकला नाही. क्रिकेट खेळल्यानंतर आता कॉमेंट्रीच्या विश्वात त्याने स्वत:ची वेगळी ओळख बनवलीय.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा आज 19 सप्टेंबर 2025 रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 18 सप्टेंबर 1977 रोजी उत्तर प्रदेशच्या आगरा येथे झाला. आकाश चोपडा सध्याचा प्रसिद्ध कॉमेंटेटर आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार यश मिळालं नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा डोंगर रचला. तो इंटरनॅशनल लेवलला काही खास करु शकला नाही. क्रिकेट खेळल्यानंतर आता कॉमेंट्रीच्या विश्वात त्याने स्वत:ची वेगळी ओळख बनवलीय.
आकाश चोपडाला 2003 साली न्यूजीलंडच्या भारत दौऱ्यात टीम इंडियाकडून टेस्ट डेब्यूची संधी मिळालेली. आपल्या डेब्यू मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 42 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 31 रन्स केलेले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीममध्ये स्थान मिळालं. पण हा टूर त्याच्यासाठी खास राहिला नाही. परदेशानंतर मायदेशातही तो फ्लॉप झाला.ऑस्ट्रेलियाई टीम जेव्हा 2004 साली भारत दौऱ्यावर आली, तेव्हा त्याने दोन कसोटी सामन्यात 15 धावा केल्या. त्यानंतर तो पुन्हा कधी टीम इंडियात येऊ शकला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती धावा केल्या?
आकाश चोपडाच इंटरनॅशनल करिअर फक्त 10 मॅचच होतं. या 10 सामन्यात त्याने 23.00 च्या सरासरीने 437 रन्स केल्या. यात 2 अर्धशतकं आहेत. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टीम इंडियातून बाहर गेल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलं. आयपीएलमध्ये सुद्धा आकाश चोपडाला संधी मिळाली. पण टीम इंडियाकडून तो पुन्हा खेळू शकला नाही.
दर महिन्याला किती पेन्शन मिळते?
आकाश चोपडाने वर्ष 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मग, त्याने कॉमेंटेटरच्या रुपात नवीन इनिंग सुरु केली. आकाशच स्वत:च यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्यातून तो भरपूर पैसा कमावतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश चोपडाची एकूण संपत्ती जवळपास 8 मिलियन डॉलरच्या आसपास आहे.भारतीय करन्सीमध्ये हे मुल्य 70 कोटी रुपयाच्या आसपास होतं. रिपोर्ट्सनुसार, आकाशला बीसीसीआयकडून दर महिन्याला पेन्शन मिळते. ती 60 हजार रुपये आहे. आकाश चोपडा कॉमेंटेटर म्हणून प्रसिद्ध आहेच. पण त्याचं विश्लेषण सुद्धा लोकांना पहायला आवडतं.