
भारत-पाकिस्तान सामना आणि मैदानावर तणाव नाही, असं कसं होईल? 21 सप्टेंबरच्या संध्याकाळी दुबईत असच काही पहायला मिळालं. सुपर-4 च्या संग्रामात भारतीय इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला. अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतकं वाढलं की, दोघांना थांबवण्यासाठी अंपायर गाजी सोहेल यांना हस्तक्षेप करावा लागला. हॅरिस रौफला फक्त एकटा अभिषेक भिडला नाही,तर या वादात त्याला शुभमन गिलचा पूर्ण सपोर्ट मिळाला. अभिषेक आणि हॅरिसने आधीच परस्परांवर शब्दांचे बाण चालवायला सुरुवात केली होती. शुबमन गिलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर या वादात उडी घेतली. त्यानंतर हा वाद आणखी भडकला. तो रौफला काहीतरी बोलताना दिसला. हॅरिस रौफच्या आधी अभिषेक शर्मा आफ्रिदीला भिडला.
शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने सिक्स मारल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. पण हॅरिससोबत झालेल्या अभिषेक शर्माच्या वादाने भारत-पाकिस्तान सामन्यातील वातावरण आणखी तापलं. पाकिस्तानी गोलंदाजांविरोधात अभिषेक शर्माच फक्त तोंड चाललं नाही, तर बॅटही चालली.
Abhishek Sharma and Shubhman gill lafda with joker Haris Rauf. #INDvPAK
Abhi & gill owned whole Pakistani jokers.🤡😂 pic.twitter.com/0thtCotFUH
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 21, 2025
अभिषेक शर्मा काय म्हणाला?
मॅच संपल्यानंतर आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा म्हणाला की, “मला वाटतं की, विनाकारण ते आमच्यावर वर्चस्व गाजवत होते. ते मला आवडलं नाही. म्हणून मी विचार केला की, बॅटनेच उत्तर देणं चांगलं आहे. मी तेचं केलं. अखेरीस टीमचा विजय या गोष्टीच प्रमाण आहे की, मी जे ठरवलं, जे मला हवं होतं, ते करण्यात मी यशस्वी ठरलो”
The way they were coming at us without any reason I didn’t like it and I responded with my bat
-Abhishek Sharma pic.twitter.com/QQ42uM1VRi
— Zubair Ali Khan (@ZubairAlikhanUN) September 21, 2025
189.74 च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या धावा
अभिषेक शर्माने पाकिस्तान विरुद्ध सुपर-4 च्या सामन्यात फक्त 39 चेंडूत 74 धावा चोपल्या. 189.74 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये अभिषेकच्या बॅटमधून 6 चौकार आणि 5 षटकार निघाले.