AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध क्रिकेटरचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर

Afghanistan Cricketer Shapoor Zadran Funeral: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं 38 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. दिल्ली-एनसीआरमध्ये उपचार सुरू असताना 7 जुलै रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली असून, रशीद खानसह अनेक खेळाडू भावुक झाले. अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध क्रिकेटरचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर
शापूर जादरान याने दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Jul 09, 2026 | 8:51 AM
Share

क्रिकेट विश्वातून आलेल्या दु:खद बातमीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं 7 जुलै रोजी दीर्घ आजाराशी झुंज देताना निधन झालं. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. 8 जुलै रोजी त्याचा वाढदिवस असतो, मात्र त्याच दिवशी त्याचं पार्थिव काबूलमध्ये पोहोचलं. हा हृदयद्रावक क्षण पाहून कुटुंबीयांसह सहकारी क्रिकेटपटूही भावुक झाले. त्याच्या निधनामुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी शोक व्यक्त केला. .

भारतात घेतला अखेरचा श्वास

शापूर जदरान याच्यावर दिल्ली-एनसीआरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित गंभीर आजाराने तो ग्रस्त होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो उपचार घेत होता,मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान 7 जुलै रोजी त्याची प्राणज्योत मालवली. शापूर याचा जन्म 8 जुलै 1987 साली अफगाणिस्तानातील लोगर प्रांतात झाला होता आणि यंदा तो 39 वाढदिवस साजरा करणार होता

अखेर काल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच (8 जुलै)शापूरचं पार्थिव काबूल विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, विद्यमान आणि माजी खेळाडू तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राशिद खान, मोहम्मद नबी यांच्यासह अनेक सहकारी क्रिकेटपटूंच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.. विशेषतः राशिद खान याला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत.

उंच बांधा, लांब केस आणि खूप वेगाने गोलंदाजी करणारा शापूर जदरान हा अफगाणिस्तान क्रिकेटच्या सुरुवातीच्या यशस्वी पिढीतील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने आपल्या कारकिर्दीत भारताचे गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या दिग्गज फलंदाजांना बाद करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमधील ऐतिहासिक ईदगाह मशिदीत त्याच्या जनाज्याची नमाज अदा करण्यात येणार असून, त्यानंतर मरंजन हिल येथील कब्रस्तानात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारल होतील.

शापूर याची काकीर्द

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शापूर जदरान याने अफगाणिस्तानकडून 44 एकदिवसीय सामन्यांत 43 विकेट्स, तर 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 37 बळी घेतले. 2012-13 च्या बांग्लादेश प्रीमियर लीगमध्येही तो सहभागी झाला होता. अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव कायम आदराने घेतल जाईल.

Follow Us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!