
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनी पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिजवानची पात्रता आणि हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या एकदिवसानंतर योगराज सिंग यांनी एक इंटरव्यू दिला. त्यात त्यांनी रिजवानच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. चेंडू कुठे टाक? हे सुद्धा आपल्याला गोलंदाजाला सांगण्याइतकी रिजवानची क्षमता नाही असं योगराज म्हणाले. फिल्डिंग कशी लावली पाहिजे? हे सुद्धा त्याला कळत नाही असं टीका करताना योगराज म्हणाले. त्या शिवाय भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान रिजवानच्या तुच्छ (घटिया) विचारांची सुद्धा त्यांनी निंदा केली. पाकिस्तान देश किंवा क्रिकेट दोन्ही लीडरशिपमध्ये कमकुवत असल्याची बोचरी टीका योगराज सिंग यांनी केली.
‘स्पोर्ट्स नेक्स्ट’शी बोलताना योगराज सिंग म्हणाले की, “रिजवानकडे नेतृत्व गुण नाहीयत. भारत-पाक मॅचमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण कुठल्या लाइनवर गोलंदाजी करायची हे कॅप्टनला सांगता आलं पाहिजे. त्याने काय फिल्ड सजवली. या सगळ्याबद्दल तो डिस्कस करताना दिसला नाही” अबरार अहमदच विकेट सेलिब्रेशन आणि कोहलीच्या शतकावेळी रिजवानच्या हेतूबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली.
‘त्यातून त्यांची तुच्छ विचारसरणी दिसली’
“विराट कोहली जेव्हा शतकाच्या जवळ होता, तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांनी वाइड चेंडू टाकायला सुरुवात केली. ही काय कृती होती? समोर बॉल टाकण्याची हिम्मत दाखवली पाहिजे. पण असं न करता ते मैदानावर जे करत होते, त्यातून त्यांची तुच्छ विचारसरणी दिसून येते” असं योगराज सिंह म्हणाले.
‘….तर तुमची टीम मला सोपवा’
योगराज सिंह पाकिस्तानी टीमच कोच बनण्याबद्दल बोलले. ‘मी त्या टीमचा कोच झालो, तर संघात प्राण आणीन’ असं ते म्हणाले. ‘स्पोर्ट्स नेक्स्ट’ शी बोलताना योगराज म्हणाले की, “मला पाकिस्तानला कॉल लावून सांगावस वाटतं की, तुमच्याकडे कोच नसेल, तर तुमची टीम मला सोपवा. एक वर्षात त्या टीमला बब्बर शेर बनवून दाखवतो”