Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकताच गौतम गंभीर यांच्या मनातला राग आला बाहेर, कोणाला सुनावलं? VIDEO
Gautam Gambhir : आपल्या घरच्या मैदानांवर दक्षिण आफ्रिकेकडून टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने पराभव झाल्यानंतर वनडे सीरीजने तारलं. विशाखापट्टणम येथे शनिवारी 6 डिसेंबरला वनडे सीरीजमधला शेवटचा सामना झाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीज हरल्यापासून टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सर्वांच्या रडारवर आहेत. त्यांना टेस्ट टीमच्या हेड कोच पदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. गौतम गंभीर यांच्याबद्दल अनेक स्टेटमेंट केली जात आहेत. त्यांच्यावर सतत टीका सुरु आहे. पण आता गौतम गंभीर यांचा संयम सुटत चालला आहे, असं वाटतं. स्वत:बद्दल विचारले जाणारे प्रश्न गौतम गंभीर यांना सहन होत नाहीयत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकल्यानंतर गंभीर यांनी आयपीएलच्या एका फ्रेंचाजयी मालकावर आपला राग काढला.
कालच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. 2-1 ने ही मालिका जिंकली. टीमच्या या विजयानंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेला आले. इथे त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.
गौतम गंभीर काय म्हणाले?
गंभीर यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये टेस्ट सीरीजमधील पराभवानंतर सुरु असलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गंभीर यांनी, लोकांनी दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात दखल देऊ नये असं म्हटलं. “लोक आणि मिडिया हे विसरले आहेत की, पहिल्या टेस्टमध्ये आपला कॅप्टन आणि बेस्ट फलंदाज दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीसाठी उतरला नाही. लोक अशा गोष्टी सुद्धा बोलले, ज्याचं क्रिकेटशी काही देण-घेण नाही. एका IPL मालकाने स्पिल्ट कोचिंगबद्दल लिहिलं. हे हैराण करणारं आहे. लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही तुमच्या कामाबद्दल बोलत नाही, त्यावेळी त्यांना सुद्धा आमच्या क्षेत्रात येण्याचा अधिकार नाही” असं गौतम गंभीर म्हणाले.
पार्थ जिंदलवर निशाणा का?
गौतम गंभीरने IPL फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदलवर निशाणा साधला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन कोचिंगमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. टीम इंडियाला स्पिल्ट कोचिंगची गरज आहे. म्हणजे टेस्ट आणि लिमिटेड ओवर्स फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कोच नियुक्त करण्याची गरज आहे असं म्हटलं.
On critics. https://t.co/MJtrls28e8 pic.twitter.com/3IIRaFQYmw
— Vimal कुमार (@Vimalwa) December 6, 2025
टीमच्या विजयानंतरही टीका
जिंदल ज्या स्प्लिट कोचिंगबद्दल बोलले, त्याची मागणी आणि चर्चा याआधी सुद्धा भारतीय क्रिकेटमध्ये झाली आहे. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्या कार्यकाळादरम्यान सुद्धा मीडियामधून अशा मागण्या झाल्या आहेत. पण शास्त्री आणि द्रविड या चर्चांवर कधी काही बोलले नाहीत. ना कोणावर त्यांनी राग काढला. पण गंभीर यांच्या स्टेटमेंटमुळे त्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. टीमच्या विजयानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.
