
12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तान यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच यजमानपद भूषवत आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांग्लादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाला दुबईत सहज विजय मिळणार नाही हे दिसतय. पण शस्त्र न टाकणाऱ्या क्षमतावान खेळाडूंची फौज त्यांच्याकडे आहे. या एका विजयाने टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले आहेत. येत्या रविवारी यावर शिक्कमोर्तब होऊ शकतं.
पाकिस्तान स्पर्धेचा यजमान असला, तरी टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळत आहे. गुरुवारी 20 फेब्रुवारीला ग्रुप स्टेजचा पहिला सामना बांग्लादेश विरुद्ध झाला. ही मॅच लो-स्कोरिंग होती. बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. कठीण परिस्थितीतून बाहेर येत बांग्लादेशने 228 धावा केल्या. पण टीम इंडियाने चार विकेट गमावून हा सामना जिंकला. या विजयात मोहम्मद शमी (5/53) आणि शुभमन गिल (101 नाबाद) यांनी महत्त्वाच योगदान दिलं.
त्यामागचं समीकरण काय?
टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली आहे. या विजयाने सेमीफायनल प्रवेशाआधी बळ मिळालं आहे. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील अजून दोन सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश कसा होईल? त्यामागचं समीकरण काय? त्यासाठी पॉइंट्स टेबलच समीकरण समजून घ्यावं लागेल.
फरक रनरेटचा
पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. न्यूझीलंड विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही टीम्सकडे दोन-दोन पॉइंट्स आहेत. पण फरक रनरेटचा आहे. सेमीफायनल प्रवेशासाठी रनरेट महत्त्वाचा आहे. न्यूझीलंड 1.200 सह पहिल्या स्थानावर आहे. भारत 0.408 दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेश (-0.408) तिसऱ्या आणि पाकिस्तान (-1.200) चौथ्या स्थानावर आहे.
स्पर्धेच समीकरण समजून घ्या
टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 23 मार्च पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध 2 मार्चला होणार आहे. दोन्ही मॅच कठीण आहेत. 23 फेब्रुवारीला पाकिस्तानला हरवल्यास टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. म्हणून टीम इंडियाने हा सामना जिंकणं महत्त्वाच आहे. भारताने असं केल्यास 4 पॉइंट्ससह ते पहिल्या स्थानावर येतील. असं झाल्यास पाकिस्तानच आव्हान संपल्यात जमा आहे. टीम इंडियाने 23 तारखेचा सामना गमावल्यास कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंडला हरवावं लागेल.