Anaya Bangar : अनाया बांगर पुन्हा बनणार मुलगा ? समोर येऊन स्पष्टच सांगितलं…

जेंडर चेंज ऑपरेशन करून मुलगा ते मुलगी असा प्रवास केलेली अनाया बांगर नेहमी चर्चेत असते. अलिकडेच तिने ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेनंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली.

Anaya Bangar : अनाया बांगर पुन्हा बनणार मुलगा ? समोर येऊन स्पष्टच सांगितलं...
अनाया बांगर पुन्हा बनणार मुलगा ?
Image Credit source: social media
| Updated on: Jul 25, 2025 | 11:03 AM

अनाया बांगर ही नेहमीच चर्चेत असतेच. तिच्याबद्दल सध्या ऐक हैराण करणारी बातमी समोर येत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगीअसलेली अनाय आधी मुलगा होती, मात्र तिने जेंडर चेंज ऑपरेशन केलं आणि ती आर्यनची अनाया झाली. मात्र आता तीच अनाया आता पुन्हा मुलगा होणार आहे, अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या, याच चर्चांवर अनायाने मौन सोडलं असून तिने चाहत्यांशी थेट संवाद साधत मनात काय आहे ते सांगितलंय.
अलिकडेच तिने तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. तिनेब्रेस्ट ऑग्मेंटेशन ( स्तन वाढवणे) आणि ट्रेकियल शेव्ह हीशस्त्रक्रिया केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून तिने याबद्दल माहिती देखील दिली होती.

पण तीच अनाया आता मुलगी ते मुलगा असा प्रवास पुन्हा करणार असल्याच्या अनेक चर्चांनी लोकं हैराण झाले. मात्र आता खुद्द अनायानेचे या चर्चांवर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं असून अशा सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ती पुन्हा जेंडक चेंज करणार नसल्याचे अनायानेच स्पष्ट केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सोशल मीडियावर लाईव्ह येऊन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. यादरम्यान एका चाहत्याने तिला विचारले, “तू पुन्हा मुलगी ते मुलगा होशील का?”. यावर अनायाने उत्तर दिले, “कधीच नाही”. या लाईव्हदरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, ज्यांची तिने उत्तम उत्तरे दिली. अनाया बांगरने अलीकडेच तिच्यावर बनवलेल्या माहितीपटाच्या रिलीजबद्दल इंस्टाग्रामवर एक मोठी घोषणा केली. या माहितीपटात तिने आपली ओळख कशी मिळवली हे सांगितले आहे.

अनायाने केली होती सर्जरी

अनाया बांगरवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. तिने ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह शस्त्रक्रिया केली. घशाचे हाड मऊ करण्यासाठी श्वासनलिका शेव्ह शस्त्रक्रिया केली जाते. तर ब्रेस्ट ऑग्मेंटेशनने तिच्या या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी पुढे नेले आहे. अनाया बांगरने उचललेली ही पावले तिच्या लिंग बदलाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तिने यापूर्वी यूकेमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि जेंडर-अफर्मिंग शस्त्रक्रियेद्वारे तिचे लिंग बदलले होते.

संजय बांगर यांची मुलगी असलेली अनाया एकेकाळी मुलगा म्हणजे आर्यन बांगर होती. हान असताना तिला क्रिकेटपटू आर्यन बांगर म्हणून ओळखले जायचे. तो यशस्वी जयस्वालसोबत अंडर-16 मध्ये मुंबईकडून खेळला होता. एवढेच नाही तर तो लँकेशायरच्या स्थानिक क्लबमध्येही खेळला आहे. आर्यन वरून अनया असा बदल झाल्यानंतरही तिची क्रिकेटची आवड अजूनही तशीच आहे आणि कधीकधी ती क्रिकेट खेळताना दिसते.