
माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरबद्दल सर्वांना माहिती असेलच. अनया बांगर ही त्यांची मुलगी आहे. अनया एक ट्रान्सजेंडर आहे. म्हणजे, ती आधी मुलगा होती नंतर ती मुलगी बनवी, आधी तिची ओळख आर्यन म्हणून झाली होती. पण काही महिन्यांपूर्वी ती इंग्लंडहून अनया म्हणून भारतात परतली. या प्रक्रियेत खूप पैसे खर्च झाले आहेत. मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित होण्यासाठी किती खर्च येतो याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत.
पण, त्याआधी 2 जुलै 2025 रोजीमुलगी बनलेल्या अनायाने शरीराच्या कोणत्या भागांवर शस्त्रक्रिया केली ते जाणून घेऊया. अनायाने यासंदर्भात एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये ती हमसून हमसून रडताना दिसली.
का रडली अनाया बांगर ?
अनाया बांगरने तिच्या ऑपरेशनपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 7 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, अनाया तिच्या शरीराच्या कोणत्या अवयवांवर शस्त्रक्रिया करणार आहे हे सांगताना दिसत आहे. मात्र तिच्या आतापर्यंतच्या परिवर्तनाच्या प्रवासाच्या आठवणीने ती भावूकही झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि काही क्षणांसाठी ती गप्प झाली.
ऑपरेशनपूर्वी अनाया बांगर भावनिक झाल्याचा व्हिडिओ तर आपण पाहिलाच. मात्र अनाया बांगर पुन्हा एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये गेली तेव्हा तिने कोणच्या अवयवांचं ऑपरेशन करवलं ते जाणून घेऊया. 2 जुलै 2025 रोजी अनाया बांगरने स्तन वाढवणे ( ब्रेस्ट ऑग्मेंटेशन)आणि ट्रेकियल शेव सर्जरी यशस्वीरित्या केली.. यामध्ये, स्तन वाढवणे याने तिच्या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी पुढे नेले आहे. तर घशाचे हाड मऊ करण्यासाठी ट्रेकियल शेव्ह सर्जरी केली जाते. या ऑपरेशननंतर अनायाच्या लिंग बदलाच्या प्रवासाला एक नवीन आयाम मिळाला आहे.
मुलगा ते मुलगी बनण्यासाठी किती खर्च ?
आता या प्रक्रियेच्या खर्चाबद्दल जाणून घेऊया. अनया बांगरने मुलगा ते मुलगी होण्यासाठी किती पैसे खर्च केले? हे समजून घेऊया. लिंग बदलाच्या या प्रवासात तिच्या खर्चाची कोणतीही अधिकृत माहिती नाही. तथापि, रिपोर्टनुसार, यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च येतो. अनायाने अलिकडेच केलेल्याब्रेस्ट ऑग्मेंटेशन और ट्रेकियल शेव करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला 10 लाख रुपयांपर्यंत खर्च आला असावा असा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रेस्ट ऑग्मेंटेशनच्या शस्त्रक्रियेचा एकूण खर्च 3.5 लाखांपर्यंत आहे. तर ट्रेकियल शेव करण्याच्या ऑपरेशनचा एकूण खर्च 2.5 लाख ते 6.5 लाखांपर्यंत असतो.