
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या खेळाडूंच्या कुटुंबाने या खेळात स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. यात भावांची जोडी असो की पिता-पुत्रांचा वारसा असो. त्यांनी एकत्र येत टीम इंडियाची ताकद वाढवली आहे. चला तर अशा खेळाडूंची नावे पाहूयात जे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
पांड्या ब्रदर्स सध्या चर्चेत असलेल्या भावडांची नावे आहेत. वडोदरा येथे रहाणारे हार्दिक आणि क्रुणाल पांड्या याने घरगुती क्रिकेट पासून आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत भारतीय टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक २०१६ साल इंटरनॅशनलमध्ये क्रिकेटमध्ये डेब्युनंतर तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू बनले. तसेच कुणाल याने २०१८ मध्ये वेस्टइंडीजच्या विरोधात पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली. दोन्ही भावांनी क्रिकेटमध्ये स्वतंत्र ओळख बनवली आहे. आयपीएलमध्ये एक साथ क्रिकेट ट्रॉफी देखील जिंकली आहे.
पठाण ब्रदर्स नावाने प्रसिद्ध असलेले इरफान आणि युसुफ पठाण क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भावांची जोडी मानली जाते. वडोदरातून आलेल्या या दोघांनी २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यात मोठी भूमिका निभावली. तर इरफानने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि स्विंग गोलंदाजीने सर्वांना चकीत केले. इरफारने आंतरराष्ट्रीय पातळीवर ३०० हून जास्त विकेट घेतल्या. तर युसूफ त्याच्या पॉवर हिटींग आणि ऑफ स्पिनसाठी ओळखले जातात. त्यांनी २००७ आणि २०११ दोन्ही वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा हिस्सा बनून एक खास यश मिळवले.
राजस्थानचे दीपक आणि राहुल चाहर देखील त्या भावंडात सामील आहेत. घरगुती क्रिकेट पासून ते आयपीएल आणि पुन्हा टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला आहे. दीपकने २०१८ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यु केला आणि टी-२० मध्ये हॅटट्रीक सह शानदार प्रदर्शन केले. तर राहुल याने २०१९ मध्ये टीम इंडियासाठी पहिली मॅच खेळली आणि धारदार लेग स्पिनने क्रिकेटच्या जगात वेगळी ओळख बनवली. या दोन्ही भावांनी आयपीएलमध्ये वेग-वेगळ्या टीमसाठी महत्वाची भूमिका निभावली.
भारतीय क्रिकेटचा सर्वात जुने आणि प्रतिष्ठीत क्रिकेट घराणे अमरनाथ याचे आहे.लाला अमरनाथ भारताचे पहिले टेस्ट सेंच्युरी मेकर होते. आणि त्यांची दोन्ही मुले मोहिंदर आणि सुरिंदर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. मोहिंदर अमरनाथ १९८३ वर्ल्ड कपचे हिरो मानले जातात. सुरिंदरने देखील टेस्ट क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे.
भारताचे महान ओपनर सुनील गावस्कर आणि त्यांचा मुलगा रोहन गावस्कर या यादीत आहेत. सुनील गावस्कर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक रन बनवले आहेत. आणि हा रेकॉर्ड कायम आहे. त्यांचा मुलगा रोहन यांनी साल २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि भारतासाठी ODI मॅच खेळल्या आहेत.
युवराज सिंह भारताचे सर्वात मोठे मॅच विनर म्हटले जातात.२००७ आणि २०११ दोन्ही वर्ल्ड कपमध्ये त्यांची कामगिरी सरस राहिली. त्याचे वडील योगराज सिंग देखील भारतासाठी इंटरनॅशलन क्रिकेट खेळले आहे. योगराज यांचे क्रिकेट करीयर छोटे राहिले.परंतू त्यांनी युवराज याला क्रिकेटर बनवण्यात मोठे योगदान दिले आहे.
१९५० आणि ६० च्या दशकातील दिग्गज फलंदाज विजय मांजरेकर भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव होते. त्यांचा मुलगा संजय मांजरेकर यानी देखील भारतासाठी टेस्ट आणि ODI दोन्ही चांगली कामगिरी केली. नंतर संजय मांजेरकर क्रिकेट समालोचनात स्थिरावले.
भारताचे महान ऑलराऊंडर वीनू मांकड ज्यांच्या नावाने मांकडिंग हा शब्द प्रचलित झाला. त्यांनी १९४६ ते १९५९ या दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये कमाल केली. त्यांचा मुलगा अशोक मांकड यांनी भारतासाठी टेस्ट मॅच आणि घरगुती क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले.
१९८३ च्या वर्ल्ड कपचे हिरो रोजर बिन्नी आणि त्यांचा मुलगा स्टुअर्ड बिन्नी भारतीय क्रिकेटच्या यादीत महत्वाचा हिस्सा आहे. रोजर बिन्नी भारताचे यशस्वी गोलंदाज होते. तर स्टुअर्ट यांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आणि ODI मध्ये भारताच्या वतीने सर्वश्रेष्ठ गोलंदाजी देखील केली.