
Arjun Tendulkar Engagement News : क्रिकेटच्या जगतातून एक मोठी बातमी समोर आली असून सरव्त्र त्याचीच चर्चा आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा, क्रिकेटपटून अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. 25 वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने ज्या मुलीशी साखरपुडा केला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक आहे. एका खासगी समारंभात अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला. त्यानंतर सोशल मीडियावर आणि सगळीकडेच या कपलबदद्दल चर्चा असून सानिया कोण आहे, काय करते, याबद्दल सर्वांनाचा जाणून घ्यायच आहे. अर्जुन आणि सानिया पहिल्यांदा कसे भेटले? हे जाणू न घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
अर्जुन तेंडुलकरचा ओळखीचा असलेला प्रियांशू गोयलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की अर्जुन तेंडुलकरने सानिया चांडोकशी साखरपुडा केला आहे, सानिया सारा तेंडुलकरची सर्वात बेस्ट फ्रेंड आहे.एवढंच नव्हे तर त्याच पोस्टमध्ये त्याने असेही नमूद केले आहे की सारा हीच व्यक्ती होती, जिने अर्जुन आणि सानियाची पहिल्यांदा एकमेकांशी ओळख करून दिली.
सारासोबत सानियाचे फोटो व्हायरल
सानिया चांडोकचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असले तरी, काही फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सारा आणि सानिया एकत्र दिसत आहेत. एवढेच नाही तर सारा तेंडुलकरने सानियाच्या अनेक पोस्ट लाईकही केल्या आहेत.
लग्झरी पेट स्पाची फाऊंडर आहे सानिया
सानिया ही प्रख्यात उद्योजक रवी घई यांची नात असून ती स्वत:देखील बिझनेसवुमन आहे. सान्या चांडोक ही मुंबईतील वरळी येथे असलेल्या मिस्टर पॉज या प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअरची संस्थापक आहे. ती केवळ सुंदरच नाही तर खूप मेहनती देखील आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झाली ग्रॅज्युएट
सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. ती देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेले आहे, जे हेल्थ-फ्रेंडली आइस्क्रीम आणि फ्रोझन मिष्टान्न ब्रँडमध्ये विशेषज्ञ आहेत. इतकेच नाही तर ग्रॅव्हिस गुड फूड्स देखील घई कुटुंबाच्या मालकीचे आहे.