T20 विश्वचषक टीममध्ये निवड झाल्यानंतर अर्शदीप सिंगचे आई-वडील भावूक

| Updated on: Sep 13, 2022 | 10:55 AM

ज्यावेळी १९ वर्षीय टीम इंडियाने T20 विश्व चषक जिंकला होता. त्यावेळी त्या टीममध्ये अर्शदीप सिंग सुद्धा होता. आता होणाऱ्या विश्वचषकाच्या टीममध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे.

T20 विश्वचषक टीममध्ये निवड झाल्यानंतर अर्शदीप सिंगचे आई-वडील भावूक
T20 विश्वचषक टीममध्ये निवड झाल्यानंतर अर्शदीप सिंगचे आई-वडील भावूक
Image Credit source: twitter
Follow us on

आशिया चषकात (Asia Cup 2022) अनेक खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे होणाऱ्या पुढच्या दौऱ्यात त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळणार की नाही अशी चाहत्यांना शंका होती. परंतु पुढच्या होणाऱ्या दौऱ्यासाठी टीममध्ये असणाऱ्या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान विरुद्ध आशिया चषकात अर्शदीप सिंगने (arshdeep singh) खराब कामगिरी केल्यामुळे त्याच्यावरती सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. पण पुढच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाल्याने त्याचे आई-वडिल भावूक झाले आहेत.

अर्शदीप सिंगची T20 विश्व चषकासाठी निवड झाल्याने त्यांच्या आईवडिलांना अधिक आनंद झाला आहे. त्याचबरोबर T20 विश्वचषकासाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आमच्या मुलाची निवड झाल्याने आम्ही अत्यंत खूश आहोत. टीम इंडिया विश्वचषक जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे असं अर्शदीपच्या आईवडिलांनी सांगितलं.

ज्यावेळी १९ वर्षीय टीम इंडियाने T20 विश्व चषक जिंकला होता. त्यावेळी त्या टीममध्ये अर्शदीप सिंग सुद्धा होता. आता होणाऱ्या विश्वचषकाच्या टीममध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. सध्या तो मुख्य टीमचा एकभाग असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होतो.

विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया

1. रोहित शर्मा (कर्णधार) 2. केएल राहुल (उपकर्णधार) 3. विराट कोहली 4. सूर्यकुमार यादव 5. दीपक हुडा 6. ऋषभ पंत 7. दिनेश कार्तिक 8. हार्दिक पंड्या 9. आर. अश्विन 10. युझवेंद्र चहल 11. अक्षर पटेल 12. जसप्रीत बुमराह 13. भुवनेश्वर कुमार 14. हर्षल पटेल 15. अर्शदीप सिंग