LPG Shortage : LPG वर संकटाचे ढग, पण PNG सुरूच; दोन्हींमध्ये फरक काय? कोणता गॅस स्वस्त?
घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या गॅसबद्दल अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. एलपीजी टंचाईमुळे लोक त्र्सत आहेत, मग त्या पुरवठ्यावर परिणाम झाला असेर तर अनेक घरात थेट पुरवठा होणार पाईप गॅस अर्थात PNG पुरवठा देखील खंडित होऊ शकतो का? भारतातील लाखो लोक स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरतात. तर, अनेक शहरांमधील घरांना पाईप गॅस पुरवठ्याचे जाळे हळूहळू विस्तारत आहे.

LPG vs PNG : आखाती देशांमध्ये पेटलेलं युद्ध आणि जागतिक तणावाचा भारतालाही फटका बसत असून गॅस पुरवठ्यावरून लोकांचा चिंता वाढली आहे. घरगुती स्वयंपाकसाठी किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला, तर घरांना होणारा पाईप गॅस (PNG) पुरवठा देखील बंद केला जाऊ शकतो का? असा सवाल लोकांच्या मनात आहे. भारतातील लाखो लोक स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरतात. तर काही शहरांत हळूहळू पाईप द्वारे घराघरांत गॅस पोहोचवला जात असून ते नेटवर्क विस्तार आहे.
अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय तणावाचा देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल का हा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (Essential Commodities Act) एक विशेष आदेश जारी केला आहे. या निर्णयानंतर, देशांतर्गत वापराला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
सरकारचं मोठं पाऊल
गॅस पुरवठा सुरक्षित करण्यासाठी, केंद्र सरकारने Essential Commodities Act, 1955 अंतर्गत एक विशेष आदेश जारी केला आहे. Priority Sector-1 अंतर्गत, सरकारने घरात वापरला जाणारा पाईप गॅस अर्थात PNG आणि वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजीला (CNG) प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, गेल्या सहा महिन्यांतील सरासरी वापराच्या आधारे या क्षेत्रांना 100 टक्के गॅस पुरवठा सुनिश्चित केला जाईल. याचा अर्थ असा की जर राष्ट्रीय गॅस ग्रिडमध्ये गॅस उपलब्ध असेल तर पाईपद्वारे गॅस प्रथम घरगुती स्वयंपाकघरांमध्ये पोहोचवला जाईल. त्यानंतरच उद्योगांना किंवा वीज प्रकल्पांना गॅस पुरवला जाईल.
LPG आणि PNG मध्ये फरक काय ?
LPG म्हणजे Liquefied Petroleum Gas आणि PNGचा अर्थ Piped Natural Gas, दोन्हींचा वापर अन्न शिजवण्यासाठी, स्वयंपाकासाठी केला जातो. पण दोन्हींच्या पुरवठ्याची, सप्लायची पद्धत वेगळी असते. एलपीजी हे सहसा प्रोपेन आणि ब्युटेन गॅसचे मिश्रण असते आणि ते सिलिंडरद्वारे घरोघरी पोहोचवले जाते.
त्यामुळे एखादा सिलेंडर संपल्यावर दुसरा सिलेंडर लावला जातो आणि नवा सिलेंडर बूक करून मागवला जातो. तर PNG म्हणजे नैसर्गिक वायू आहे असून तो प्रामुख्याने मिथेनपासून बनलेला असतो. शहरांमध्ये टाकलेल्या पाइपलाइनद्वारे थेट घरांमध्ये पोहोचवला जातो. यामुळे सिलेंडर बदलण्याची गरज नसते आणि गॅसचा सतत पुरवठा होतो.
कोणता गॅस स्वस्त ?
दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडर (LPG) आणि पाईप गॅस (PNG) च्या किमतींमध्ये लक्षणीय फरक आहे. इंडियन ऑइलनुसार, दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या विना-अनुदानित इंडेन एलपीजी सिलिंडरची किंमत 7 मार्च 2026 पासून 913 रुपये आहे. ग्राहकांना प्रति सिलिंडर 900 पेा जास्त पैसे मोजावे लागतात.
तर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील घरांना पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसची किंमत 47.89 रुपये प्रति SCM आहे. पीएनजी गॅस थेट पाईपलाइनद्वारे घरांना पुरवला जातो आणि, त्या वापरलेल्या गॅसच्या प्रमाणात बिल आधारित असते. किंमत लक्षात घेतली तर PNG हाँ सामान्यतः LPG सिलिंडरपेक्षा स्वस्त पडतो.
भारतातील बहुतांश घरात अजूनही एलपीजी सिलिंडर वापरला जातो. सरकारी आकडेवारीनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात देशात अंदाजे 31.3 दशलक्ष टन एलपीजीचा वापर झाला. दरम्यान, पाईपद्वारे गॅस जोडण्या कमीच आहेत. 2024 च्या अखेरीस, भारतात अंदाजे 1.36 कोटी घरगुती पीएनजी कनेक्शन होते, तर एलपीजी जोडण्यांची संख्या अंदाजे 33.2 कोटी आहे.
