AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG गॅसचे नो टेन्शन, होर्मुज सामुद्रधुनीतून मोठी बातमी, भारताचे 2 जहाज…

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात भारताला मोठा फटका बसला. अनेक व्यवसाय अडचणीत आलीत. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. गॅस नसल्याने अनेक व्यावसायिकांना उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली. यादरम्यानच भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

LPG गॅसचे नो टेन्शन, होर्मुज सामुद्रधुनीतून मोठी बातमी, भारताचे 2 जहाज...
Strait of Hormuz
| Updated on: Mar 14, 2026 | 9:30 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. आज या युद्धाचा 15 वा दिवस आहे आणि मोठा भडका उठला. दोन्ही बाजूंकडून हल्ले तीव्र होत असल्याने परिस्थिती अधित तणावपूर्ण झाली. इराणचे नववे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठे हल्ले सुरू झाले. त्यांनी इराणी जनतेसाठी खास निवेदनही जाहीर केले. मोजतबा खामेनेई अमेरिकेला सळो की पळो करून सोडणार हे स्पष्टच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलचा अंदाजा चुका आहे. त्यांना अजिबातच वाटले नव्हते की, इराण इतक्या घातकप्रकारे उत्तर देईल. अमेरिकेकडून हे युद्ध चार आठवडे सुरू राहणार असल्याचे सांगितले. मात्र, सध्याची परिस्थिती बघता हे स्पष्ट आहे की, युद्ध पुढील काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. इराणकडून अमेरिकेला वटणीवर आणण्याकरिता होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्यात आला. फक्त एक ते दोन देशांसाठी हा मार्ग सुरू आहे. बाकी इतर देशांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला.

होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याने निर्यात आणि आयात थांबली. अनेक देशात तेलाची आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. भारतातही मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत. अनेक उद्योग यामुळे धोक्यात आली. मात्र, भारताला मोठा दिलासा इराणकडून देण्यात आला. चर्चेनंतर भारताचे जहाज होर्मुज सामुद्रधुनीमधून सोडले जात आहेत.

इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, भारतीय जहाजांनी त्यांचा झेंडा लावावा आणि इराणी नाैदलाच्या संपर्कात राहावे. इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या जहाजांवर थेट हल्ला केला जात आहे आणि पेटून दिली जात आहेत. भारतासोबतची मैत्री कायम ठेवत इराणकडून भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीचा वापर केला जाऊ दिला जात आहे.

आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीवरून दोन भारतीय जहाज भारताच्या दिशेने निघाले आहेत. सुरक्षित रस्ता इराणकडून या दोन्ही जहाजांना देण्यात आला. हे दोन जहाज भारतात काही तासात दाखल होतील. यामुळे सध्या असलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यातून नक्कीच थोडातरी दिलासा भारताला मिळेल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल