
आशिया चषकात (Asia Cup 2022) सुपर चार मधील महत्त्वाच्या मॅचमध्ये जरी विराट कोहलीला (Virat Kolhi) खेळता चांगली खेळी करता आली नाही. परंतु कोहलीने इतर सामन्यात चांगली खेळी केली आहे. आशिया चषकात चांगली कामगिरी केल्याने विराट कोहलीची पुन्हा सोशल मीडियामध्ये (Social Media) अधिक चर्चा आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी सुद्धा विराट कोहलीची अधिक तारिफ केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीने सुद्धा विराटला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आशिया चषकातील महत्त्वाचे सामने हारल्यानंतर भारतीय टीम वरती टीका झाली होती. परंतु शेवटच्या सामन्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने कमी चेंडूत शतक झळकावलं. त्यानंतर रोहित शर्माने त्यांची एक छोटीसी मुलाखत घेतल्याचा व्हिडीओ सुद्धा बीसीसीआयने शेअर केला आहे.
विराट कोहलीने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याचबरोबर त्याने आता ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. त्यामुळे तो आता भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अनुष्का शर्माने विराटचा एक फोटो इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. त्यामध्ये तिने मी तुमच्या कायम सोबत आहे असा आशय लिहिला आहे. त्यामुळे पुन्हा त्यावर कमेंट सुरु झाल्या आहेत.
ज्यावेळी विराटने शतक मारलं त्यावेळी सुद्धा भारतीय नेटकऱ्यांनी विराटला सोशल मीडियावर अधिक ट्रोल केलं आहे.