Ind vs Pak, Sahibzada Farhan, Haris Rauf : साहिबजादा फरहान-हारिस रौफला उर्मटपणा भोवणार ! कोणी केली तक्रार ?

India vs Pakistan Asia Cup : आशिया कप 2025 स्पर्धेत रविवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू साहिबाजादा फरहान आणि हारिसरौफ यांनी उद्धपणा करत केलेल्या कृतींचे चागलचे पडसाद उमटले असून त्यावरून बरीच टीकाही झाली. गन सेलिब्रेशन आणि प्लेन पाडण्याची ॲक्शन करत या दोन्ही खेळाडूंनी स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतला असून ती कृती त्यांना चांगलीच महागात पडू शकते.

Ind vs Pak, Sahibzada Farhan, Haris Rauf :  साहिबजादा फरहान-हारिस रौफला उर्मटपणा भोवणार ! कोणी केली तक्रार ?
साहिबजादा फरहान-हारिस रौफला उर्मटपणा भोवणार ?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 25, 2025 | 12:08 PM

आशिया कप 2025 मधील सुपर-4 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी (Team India) पाकिस्तानला (Pakistan) धूळ चारली. भारताने पाकचा 6 गडी राखून पराभव करत दणदणीत वियजय मिळवला. या सामन्यादराम्यान बराच हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मात्र शर्मा- गिल यांनी पाकिस्तानी खेळाडूंना दिलेले प्रत्युतर जसे लक्षात राहील, त्यापेक्षाही लोकांच्या नजरेत आला तो पाकचे खेळाडू हारिस रौफ (Haris Rauf) आणि साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) यांचे उर्मटपणाचे वर्तन. फलंदाजी करताना अर्धशतक झळकावल्यानतंर साहिबजादाने केलेले गन सेलिब्रेशन असो किंवा फिल्डींग करताना हारिस रौफने माज दाखवत प्लेन पाडण्याची केलेली ॲक्शन, त्यामुळे चांगलीच खळबळ माजली असून अनेक खेळाडूंनी त्यांच्या कृतीवर नाराजी दर्शवली. सोशल मीडियावरही पाकच्या या खेळाडूंवर स़डकून टीका करण्यात आली आहे.

एवढंच नव्हे तर आता त्या दोघआंनाही या उर्मटपमाची, उद्धट वागण्याची चांगलीच शिक्षा मिळू शकते. कारण बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा आणि हारिस रौफ यांचा उद्धपणा आणि भडकावू वर्तनाविरोधात आयसीसीमध्ये अधिकृतरित्या कर्रार दाखल करत नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षा मिळणार ?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने बुधवारी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि आयसीसीला त्यासंदर्बात ईमेल मिळाला आहे. जर साहिबजादा आणि हारिस रौफ यांनी हे आरोप लेखी स्वरूपात नाकारले तर त्यांना आयसीसी एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

पीसीबीने केली सूर्याची तक्रार

भारताने उचललेल्या या पावलानंतर आता पीसीबीने लगेच तक्रारीचा पाढा वाचला आहे. प्रत्युत्तरादाखल त्यांनीही तक्रार केली आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातील विजय हा ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केल्याबद्दल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केल्याबद्दल सूर्यकुमार यादव याच्याविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आयसीसीकडे तक्रार दाखल केली.

Ind vs Pak, Sahibzada Farhan : भारताविरुद्ध ‘गन सेलिब्रेशन’ करणाऱ्या साहिबजादा फरहानने तोंड उघडलं, पहिली प्रतिक्रिया..

सूर्याचे ते विधान ‘राजकीय’ आहे, असा पीसीबीचा आरोप आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या ही तक्रार कधी दाखल झाली हे पाहणे आवश्यक आहे, जी त्याच्या टिप्पणीच्या सात दिवसांच्या आत दाखल करायला हवी होती. आता यावर काही कारवाई होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रौफ-साहिबजादाच्या कोणत्या कृतीमुळे बीसीसीआय नाराज ?

21 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यादरम्यान, रौफने भारतीय सैन्याच्या लष्करी कारवाईची खिल्ली उडवण्यासाठी विमान पाडण्याचा इशारा केला होता. त्याच्या गोलंदाजीदरम्यानही, हरिस रौफने भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना शिवीगाळ केली होती, ज्याला त्या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या बॅटने प्रत्युत्तर दिले. तर त्याच सामन्यादरम्यान, पाकिस्तान फलंदाजी करत असताना साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर, त्याच्या बॅटचा वापर मशीनगनसारखा करून आणि बंदुकीचा इशारा करून ‘गन सेलिब्रेशन’ करत, आनंद साजरा केला, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दोघांवरही लागू शकते बंदी

पाकिस्तानी खेळाडू रौफ आणि साहिबजादा दोघांनाही आयसीसीसमोरच्या सुनावणीत स्वतःच्या कृतीचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर ते त्यांच्या कृतींचे समर्थन करत ते योग्य असल्याचे सिद्ध करू शकले नाही, तर त्यांना आयसीसीच्या आचारसंहितेनुसार दंड होऊ शकतो.

पीसीबी प्रमुख नक्वीची टिप्पणी 

पाकच्या खेळाडूंपाठोपाठ आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनीही आगीत तेल ओतलं. मोहसिन नक्वी यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट केली. क्रिस्टियानो रोनाल्डो एक बोट दाखवत असलेला स्लो-मोशन व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पोर्तुगीज दिग्गज काही हावभाव करताना दिसत आहे. असाच काहीसा इशारा रौफनेही रविवारच्या सामन्यात केला होता. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असण्यासोबतच त्यांच्या देशाचे “गृहमंत्री” देखील आहेत आणि भारताविरुद्ध भडकाऊ विधाने करण्यासाठी ओळखले जातात.

आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत पोहोचतला असून आता रविवारी त्यांची कोणाशी लढत होईल ते आज स्पष्ट होईल. पाकिस्तानशी पुन्हा सामना होईल की नाही ते आजच्या सामन्यानंतर कळू शकेल.