Asia Cup 2025, Ind vs Pak : अवघ्या 10 सेकंदांसाठी 16 लाख रुपये ! भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान…

India Vs Pakistan Asia Cup 2025 Ad Rates : आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांशी भिडणार का, त्यांच्यात सामना होणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. मात्र हा सामना झालाच तर त्यादरम्यान जाहिरातींसाठी तूफान पैसे खर्च करावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Asia Cup 2025, Ind vs Pak :  अवघ्या 10 सेकंदांसाठी 16 लाख रुपये ! भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान...
भारत वि. पाकिस्तान मॅच
Image Credit source: social media
| Updated on: Aug 18, 2025 | 12:34 PM

आशिया कपला अद्याप सुरूवात झालेली नाही, मात्र तो पहिल्यापासूनच चर्चेत आहे. भारतीय संघ 14 सप्टेंबर रोजी ग्रुप ए मॅचमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. भारत आणि पाक दरम्यान कोण जिंकतंय याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. आशिया कप 2025 चे लाईव्ह टेलीकास्ट आणि स्ट्रीमिंगचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. वृत्तानुसार, आशिया कप 2025 मधील भारताच्या सामन्यांच्या जाहिरातींची किंमत 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 14 ते 16 लाख रुपये आहे.

यावेळी आशियाई स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अधिकृत मीडिया राइट होल्डर असलेल्या सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) ने सामन्यादरम्यान जाहिराती चालवणाऱ्यांसाठी जाहिरात कार्ड दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान टीव्हीवर 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

टीव्हीवर जाहिरातींसाठी पॅकेज

• को-प्रेजेंटिंग स्पॉन्सरशिप: 18 कोटी रुपये

• असोसिएट स्पॉन्सरशिप : 13 कोटी रुपये

• स्पॉट-बाय पॅकेज ( भारत आणि इतर मॅचेस): 10 सेकंदासाठी 16 लाख प्रत्येकी, किंवा 4.48 कोटी रुपये

सोनी LIV वर डिजिटल डील्स

• को-प्रेजेंटिंग आणि हायलाइट्स पार्टनर : प्रत्येकी 30 कोटी रुपये

को-पॉवर्ड-बाय पॅकेज : 18 कोटी

• सर्व डिजिटल जाहिरातींपैकी 30% जाहिराती भारतातील सामन्यांसाठी राखीव आहेत.

फॉर्मॅटनुसार जाहिरातीचे दर

• प्री-रोल्स: 275 रुपये प्रति 10 सेकंड (भारतीय सामन्यांसाठी 500 रुपये; भारत-पाकिस्तान साठी 750 रुपये )

• मिड-रोल्स: 225 रुपये (भारतीय सामन्यांसाठी 400 रुपये; भारत-पाकिस्तान साठी 600 रुपये )

• कनेक्टेड टीवी जाहिरीत : 450 रुपये (भारत-पाकिस्तान साठी 800 रुपये ; भारत-पाकिस्तान साठी 1,200 रुपये)

आशिया कप 2025 चे सामने 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळवले जातील. दुबई आणि अबू धाबीमध्ये आठ संघांमध्ये 19 सामने खेळवले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रविवार 14 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 सामना आयोजित करण्यात येईल. आशिया कप 2025 मधील भारताचा पहिला ग्रुप अ सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळला जाईल. ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमानविरुद्ध खेळला जाईल.

एक सुपर फोर मॅच (22 सप्टेंबरला A2 आणि B1 दरम्यान) अबू धाबीमध्ये होईल. उर्वरित पाच सुपर फोर सामने आणि अंतिम सामना (28 सप्टेंबर रोजी) दुबईमध्ये खेळवला जाईल. ग्रुप बी मधील सहा पैकी पाच सामने आणि ग्रुप ए मधील दोन सामने (यूएई विरुद्ध ओमान आणि भारत विरुद्ध ओमान) अबू धाबीमध्ये होतील.

आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे गट अ मध्ये आहेत. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे गट ब मध्ये आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील.