
टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनच कौतुक केलं आहे. संजू सॅमसनला T20 आशिया कप 2025 साठी टीममध्ये स्थान मिळालय. पण त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणं, कठीण दिसतय. भले, त्याने केरळ क्रिकेट लीगमध्ये धावा केल्या असतील किंवा मागच्या 10 टी 20 इंटरनॅशनलमध्ये तीन शतकं झळकावली असतील. मात्र, तरीही संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणं कठीण दिसतय. संजू टॉप ऑर्डरमधील एक धोकादायक फलंदाज आहे. पण सध्या टॉप 3 मध्ये जागा रिकामी नाहीय. रवी शास्त्री यांच्या मते संजू सॅमसनला टॉप ऑर्डरमध्ये खेळवूनच सामना जिंकू शकता. 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कप टुर्नामेंट आधी रवी शास्त्रीने हा महत्वाचा सल्ला टीम इंडियाला दिला आहे.
“संजू सॅमसन टॉप ऑर्डरमध्ये खेळताना खतरनाक बॅटिंग करतो. इथेच तो तुम्हाला मॅच जिंकवून देऊ शकतो. कुठल्याही इनिंगमध्ये त्याने धमाकेदार प्रदर्शन केलं, तर तो तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतो. त्याला टॉपमध्येच राहूं दे. तेच चांगलं आहे” असं माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हिंदूशी बोलताना म्हणाले. संजू सॅमसनने अलीकडेच केसीएलच्या 5 इनिंगमध्ये 368 धावा केल्या. यात 350 धावा त्याने ओपनर म्हणून केल्या आहेत. पण चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी स्पष्ट केलय की, ‘संजू सॅमसन ओपनिंग करणार नाही’
अनेकवर्ष त्याचं आत-बाहेर सुरु
T20 आशिया कप 2025 साठी टीमची घोषणा झाल्यानंतर चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती. त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलेलं की, शुबमन गिल टीममध्ये नसेपर्यंतच संजू सॅमसन ओपनिंग करत होता. आता शुबमन गिल व्हाइस कॅप्टन आहे. त्यामुळे तो अभिषेक शर्मासोबत इनिंगची सुरुवात करेल. अशावेळी सॅमसन ओपनिंग करु शकणार नाही. तीन नंबरचा स्पॉट सुद्धा रिकमी नाहीय. फिनिशर म्हणून सॅमसन फ्लॉप आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश कठीण आहे. संजू सॅमसनला अजूनपर्यंत टीम इंडियात स्वत:च भक्कम स्थान निर्माण करता आलेलं नाही. अनेकवर्ष त्याचं आत-बाहेरच सुरु आहे.