
India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेला सुरूवात झाल्यापासूनच ती प्रचंड चर्चेत असून स्पर्धेतील रोमांच थांबण्याचा नावचं घेत नाही. भारत-पाकिस्तानमधील महिल्या सामन्यापासूनच सॉलिड ड्रामा दिसत असून कालच्या सामन्यात तर बरीच तूतू-मैमै झालेली दिसली. पाकच्या खेळाडूंचं विचित्र वागणं, त्यातच झालेला पराभव त्यांना झोंबला, त्यामुळे त्यांचं वागणं खूप चर्चेत होतं. 9 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आशिया कपमध्ये भीरत-पाक आत्तापर्यंत 2 वेळा आमने -सामने आले असून दोन्ही वेळा भारतीय संघाने त्यांना धूळ चारली. आणि भविष्यातही, याच स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये पुन्हा टक्कर होऊ शकते.
पण प्रश्न असा आहे की, भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी होईल? जर स्पर्धेच्या स्वरूपानुसार हे दोन्ही संघ आता अंतिम फेरीत समोर येणार असतील, तर तिथे पोहोचेपर्यंतचा त्यांचा रस्ता कसा असेल ?
सुपर-4 स्टेजवर आता काय परिस्थिती ?
भारत आणि पाकिस्तान दोघेही सध्या आशिया कप 2025 च्या सुपर-4फेरीत खेळत आहेत. सुपर-4 च्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर असं दिसेल की, या टप्प्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभूत केल्यामुळे, भारत सध्या या गुणतालिकेत आघाडीवर आहे. भारतीय संघाचे सध्या 2 पॉईंट्स आहेत आणि 0.689 हा रनरेट आहे. तर भारताकडून दारूण पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान सुपर फोर पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. त्यांचा रनरेट सुद्धामायनस (-0.689) आहे. दरम्यान सुपर 4 फेरीत प्रत्येकी 1-1 सामना खेळल्यानंतर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा रन रेट देखील प्लस झोनमध्ये आहे, तर श्रीलंकेचा रन रेट मायनस झोनमध्ये आहे.
भारत-पाकिस्तान पुन्हा लढत कधी ?
आत असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे तो म्हणजे, आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पुन्हा एकमेकांसमोर यायचं असेल तर भारत-पाकिस्तानचा संघ कसा पुढे जाईल. तसं झालं तर या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांशी भिडतील, त्यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी पर्वणी असेल. याचं समीकरण नीट समजून घेऊया.
भारत आणि पाकिस्तानला आता सुपर-4 मध्ये आणखी 2-2 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ सध्या विजयरथावर स्वार आहे, आणि ते जर असाचा विजय मिळवत राहिले तर हा संघ अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित आहे. दरम्यान, सुपर फोरमध्ये भारताकडून पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तानला आता त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. 23 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि 25 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धचे सामने पाकिस्तानला जिंकावे लागतील.
जर पाकिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले आणि भारताने 24 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेला हरवले, तर त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील की नाही हे ठरू शकेल. एकंदरीत, बांगलादेशविरुद्धचा सामना भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्त्वाचा असेल, कारण बांगलादेशने सुपर 4 फेरीत आपला पहिला सामना आधीच जिंकला आहे.