Asian Games 2026: अरेरे थोडक्यात सुवर्ण पदक हुकलं, तामिळनाडूच्या पोरीनं भारताला मिळवून दुसरं पदक

Asian Games Medal 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात एलावेनिल वलारिवानने रौप्य पदक जिंकले आहे.

Asian Games 2026: अरेरे थोडक्यात सुवर्ण पदक हुकलं, तामिळनाडूच्या पोरीनं भारताला मिळवून दुसरं पदक
| Updated on: Sep 20, 2026 | 12:35 PM

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात एलावेनिल वलारिवानने रौप्य पदक जिंकले आहे. एलावेनिल वलारिवान एकेकाळी सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती, परंतु शेवटच्या दोन खराब शॉट्समुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. जपानी नेमबाज ताइचीने सुवर्णपदक पटकावले.

भारताला मिळालं दुसरं रौप्य पदक

तामिळनाडूच्या २७ वर्षीय एलावेनिल वलारिवानने २५२.४ गुणांसह रौप्य पदक जिंकले. शेवटच्या दोन शॉट्समध्ये तिच्या पदकाचा रंग बदलला, ज्यात जपानी नेमबाज ताइचीने अधिक गुण मिळवून तिला मागे टाकले. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पहिल्या दिवशी नेमबाजीमधील भारताचे हे दुसरे रौप्य पदक आहे. भारताचे पहिले रौप्य पदक १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात जिंकले होते आणि त्यातही एलावेनिल वलारिवानने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीमधील भारताचे हे दुसरे आणि एकूण दुसरे पदक आहे. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतील एलावेनिल वलारिवनचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी, तिने सोनम मस्कर आणि विदर्शा कोचलुमकल विनोद यांच्यासोबत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते. महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत भारताची सोनम मस्कर सहाव्या स्थानावर राहिली आणि तिने निराशा केली. सोनमने एकूण १६७ गुण मिळवले. अंतिम फेरीत एकूण आठ नेमबाजांनी भाग घेतला होता. आता स्पर्धेत भारताला आणखी किती पदके मिळतील याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. भारतीय लेकींनी सुरुवात दणक्यात केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us