Aus vs Ind 3rd test | अश्विन-जाडेजा पुन्हा कांगारुंना नाचवणार, सिडनीचे पिच क्युरेटर काय म्हणतात?

| Updated on: Jan 06, 2021 | 5:29 PM

तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind 3rd test | अश्विन-जाडेजा पुन्हा कांगारुंना नाचवणार, सिडनीचे पिच क्युरेटर काय म्हणतात?
सिडनी क्रिकेट ग्राऊंड
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 3rd Test) यांच्यात 7 जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. मात्र प्रत्येक सामन्यात खेळपट्टीची (पीच) भूमिका महत्वाची राहते. सामन्याचा निकाल काय लागेल, पीच गोलंदाजांनी की फलंदाजांना अनुकूल ठरणार हे सर्व पीचवर ठरतं. या सामन्याचं भवितव्य हे वातावरणावर ठरेल, अशी प्रतिक्रिया पीच क्युरेटर अॅडम लुईस यांनी दिली आहे. (aus vs ind 3rd test sydney cricket ground pitch likely helpfull to r ashwin and ravindra jadeja )

काय म्हणाले लुईस?

सिडनीची खेळपट्टी खेळाच्या हिशोबाने चांगली असेल. ही खेळपट्टी गेल्या वर्षासारखी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल, असे लुईस म्हणाले. गेल्या वर्षात सिडनीत न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे जर खेळपट्टीकडून अशीच मदत मिळाली तर रवीचंद्रन अश्विनसाठी ही खेळपट्टी चांगलीच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“सिडनीची खेळपट्टी फार सामान्य राहिल. ही खेळपट्टी वेगवान असेल. सुरुवातीला या खेळपट्टीकडून आवश्यक ती गती मिळते. मात्र यानंतर ही खेळपट्टी आपल्या स्वाभाविक प्रमाणे खेळ करते. म्हणजेच फिरकीपटुंना पोषक तर वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी अनुकूल ठरते”, असंही लुईस यांनी नमूद केलं.

वातावरणावर खेळपट्टी आधारित

“चांगल्यात चांगली खेळपट्टी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. खेळपट्टीवर चेंडू उसळी खाणारा, तसेच हिरवं गवत असावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मात्र या आठवड्यात वातावरणाचा खेळपट्टीवर प्रतिकूल परिणाम होउ शकतो. प्रत्येक वेळेस येथील वातावरण वेगळं असतं. तीन वर्षांपूर्वी येथे इंग्लंडने एक सामना खेळला. त्यावेळेस येथील वातावरण 30-40 डिग्री सेल्सियस इतकं वातावरण होतं. त्यावेळेस उष्ण वातावरण होतं. तसेच वारा वाहत होता. मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. यावेळेस ढगाळ वातावरण आहे. तीन दिवसांपू्र्वी आम्ही येथे सूर्य प्रकाशही पाहिला. त्यामुळे वातावरणाबाबत येथे अनिश्चितता आहे. आम्ही पीचसाठी 100 टक्के प्रयत्न केले आहेत”, असं लुईस म्हणाले.

टीम इंडियाच्या अखेरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वातावरणामुळे कांगारुंचा पराभव होता होता राहिला. त्यामुळे यावेळेस कोणत्याही प्रकारे वातावरणामुळे सामन्यात अडथळा येऊ नये, अशी इच्छा दोन्ही संघांची असणार आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | सिडनी कसोटीत टीम इंडियाची मदार दोन मुंबईकरांवर

Aus vs Ind 3rd Test | रोहित शर्माचं पुनरागमन, नवदीप सैनीला पदार्पणाची संधी, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

(aus vs ind 3rd test sydney cricket ground pitch likely helpfull to r ashwin and ravindra jadeja)