Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

| Updated on: Jan 08, 2021 | 12:52 PM

जाडेजाने स्टीव्ह स्मिथला 131 धावांवर रन आऊट केलं. यासह ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 आटोपला.

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट
जाडेजाचा रॉकेट थ्रो
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind 3rd Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जाडेजाने शतकवीर स्टीव्ह स्मिथला (Jadeja Run Out To Steve Smith) रन आऊट करत ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. जाडेजाने केलेल्या परफेक्ट थ्रोवर स्मिथ स्ट्राईक एंडला रन आऊट झाला. जाडेजाचं या थ्रो मुळे कौतुक केलं जात आहे. (aus vs india 3rd test ravindra jadeja rocket throw and steve smith run out)

जाडेजाचा रॉकेट थ्रो 

नक्की काय झालं?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सामन्यातील 106 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर स्मिथने फटका मारला. स्मिथने पहिली धावा पूर्ण केली. मात्र तो दुसऱ्या धावेसाठी आग्रही होता. स्मिथ दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने पळाला. पण डीप स्केवअर लेगच्या दिशेला जाडेजा होता. जाडेजाने स्मिथला दुसरा धावा घेताना पाहिलं. जाडेजाने थेट थ्रो केला. तो थ्रो परफेक्ट स्टंपवर लागला. अशा प्रकारे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला. जाडेजाच्या या थ्रोचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

जाडेजाचा चौकार

जाडेजाने फिल्डिंगसह गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली. जाडेजाने कांगारुंना आपल्या फिरकीवर नाचवलं. जाडेजाने 18 ओव्हर बोलिंग केली. यापैकी 3 ओव्हर या मेडने टाकल्या. जाडेजाने 65 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या. जाडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायल या फलंदाजांना आऊट केलं.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | जोरदार जाडेजा, दमदार सैनी, बुम बुम बुमराह, गोलंदाजांनी कांगारुंना तंगवलं

Australia vs India, 3rd Test, 2nd Day Live : अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी, टीम इंडियाला दुसरा धक्का

(aus vs india 3rd test ravindra jadeja rocket throw and steve smith run out)