Australia vs India, 3rd Test, 2nd Day Stumps : शुभमन गिलची अर्धशतकी खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 2 बाद 96 धावा

Australia vs India, 3rd Test, 2nd Day Stumps : शुभमन गिलची अर्धशतकी खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 2 बाद 96 धावा
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे.

अक्षय चोरगे

| Edited By: sanjay patil

Jan 08, 2021 | 1:43 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Team India vs Australia 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या तिसऱ्य सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा 9 आणि कर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावांवर नाबाद होते. टीम इंडियाने दिवसखेर 2 विकेट्स गमावून 96 धावा केल्या आहेत.  (australia vs india 2020 21 3rd test day 2 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground) लाईव्ह स्कोअरकार्ड

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शुभमन आणि रोहित दोघेही सेट झाले. मात्र रोहितला हेझलवूडने आपल्याच गोलंदाजीवर आऊट केलं. रोहितने 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा केल्या.

रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजारासह गिलने स्कोअरबोर्ड हलता ठेवला. या दरम्यान गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतकी खेळीनंतर गिल आऊट झाला. गिलने 101 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा केल्या. गिलनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर शिल्लक होत्या. यामुळे रहाणे-पुजारा या जोडीने संथ खेळ केला. या पुजारा आणि रहाने या दोघांनी दिवसखेर नाबाद प्रत्येकी 9 आणि 5 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 338 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 131 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेनने 93 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात अर्धा तास लवकर

दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात अर्धा तास आधी करण्यात आली. म्हणजेच सामना 5 वाजता सुरु होतो. मात्र पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे काही षटकांचा खेळ होऊ शकला नाही. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आज सामन्याची सुरुवात 4 वाजून 30 मिनिटांनी झाली.

संबंधित बातम्या : 

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

(australia vs india 2020 21 3rd test day 2 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें