AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी ‘गे’ नाही, ‘बॉयफ्रेंड’ सोबतच्या फोटोवरील चर्चेनंतर फॉकनरचे स्पष्टीकरण

सिडनी (आस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर जेम्स फॉकनरने काल मोठ्या थाटामाटात स्वत:चा वाढदिवस साजरा केला. फॉकनरने वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोवरून तो समलैंगिक (Gay) असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत जेम्सने इनस्टाग्रामवर नुकतंच नवीन पोस्ट करत, गे नसल्याचं स्पष्टीकरण दिली आहे. जेम्सने काल म्हणजे सोमवारी 29 एप्रिल रोजी 29 वा वाढदिवस […]

मी 'गे' नाही, 'बॉयफ्रेंड' सोबतच्या फोटोवरील चर्चेनंतर फॉकनरचे स्पष्टीकरण
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

सिडनी (आस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर जेम्स फॉकनरने काल मोठ्या थाटामाटात स्वत:चा वाढदिवस साजरा केला. फॉकनरने वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोवरून तो समलैंगिक (Gay) असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत जेम्सने इनस्टाग्रामवर नुकतंच नवीन पोस्ट करत, गे नसल्याचं स्पष्टीकरण दिली आहे.

जेम्सने काल म्हणजे सोमवारी 29 एप्रिल रोजी 29 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने जेम्सने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत स्वत: जेम्स फॉकनर त्याची आई रोस्लिन कैरोल फॉकनर आणि बॉयफ्रेंड रोबजुबस्तासोबत जेवताना दिसत आहे. बर्थडे डिनर विथ बॉयफ्रेंड रॉबजुबस्ता आणि आई रोस्लिन कैरोल फॉकनर’ अस कॅप्शन जेम्स फॉकनरने या फोटोला दिले आहे. त्यासोबतच त्याने गेल्या 5 वर्षांपासून एकत्र असल्याचंही त्या फोटोखाली लिहिलं आहे. जेम्सने पोस्ट खाली दिलेल्या या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी तो समलैंगिक असल्याचं म्हटलं होतं.

जेम्सने केलेल्या या खुलासामुळे त्याच्या क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे जेम्स फॉकनर आणि रॉब लवकरच विवाहबंधनात असल्याच्या अनेक चर्चाही क्रिकेटविश्वात रंगल्या होत्या.

यानंतर नुकतंच जेम्स फॉकनर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. “मी काल (29 एप्रिल) रात्री टाकलेल्या पोस्टमुळे मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. मी गे नाही, पण एलजीबीटी कम्युनिटीकडून मिळालेला पाठिंबा पाहून मला आनंद झाला. प्रेम हे प्रेम असते, ते कधीही विसरता येत नाही. पण मी आणि रॉब गेल्या पाच वर्षापासून हाऊसमेट असून चांगले मित्र आहोत. काल रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षाच्या मैत्रीचे सेलिब्रेशन केलं. माझ्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद” असे जेम्सने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेम्स फॉकनरने आतापर्यंत एक टेस्ट मॅच, 69 एकदिवसीय सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. त्याशिवाय त्याने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. जेम्सने ऑक्टोबर 2017 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याशिवाय पुणे वॉरियर्स, गुजरात लाईन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स यांसह विविध आयपीएल टीममध्ये जेम्सचा सहभाग होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...