Aus vs Ind 4th Test | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया, मालिका कोण जिंकणार?

| Updated on: Jan 14, 2021 | 7:07 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind 4th Test | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया, मालिका कोण जिंकणार?
टीम इंडिया
Follow us on

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात शुक्रवार 15 जानेवारीपासून चौथा आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये (brisbane) खेळण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे हा चौथा सामना चुरशीचा आणि निर्णायक होणार आहे. (australia vs india 4th test match at brisbane preview)

ब्रिस्बेनमध्ये वरचढ कोण?

ब्रिस्बेनमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 6 सामने खेळण्यात आले आहेत. टीम इंडियाला या 6 पैकी एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. कांगारुंनी 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये गेल्या 32 वर्षात एकही सामना गमावलेला नाही.

ब्रिस्बेनमधील कांगारुंची कामगिरी

कांगारुंनी आतापर्यंत ब्रिस्बेनवर एकूण 55 कसोटी सामने खेळले आहेत. या 55 पैकी 33 सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला आहे. तर फक्त 8 कसोटींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे कांगांरुनी 1988 पासून या मैदानात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या मैदानात कांगारुंना वेस्टइंडिजकडून 1988 मध्ये अखेरचा कसोटी पराभव स्वीकारावा लागला होता.

मालिका कोण जिंकणार?

दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे बरेचसे खेळाडू हे नव्या दमाचे आहे. त्यात ऑस्ट्रेलियाने 32 वर्षात ब्रिस्बेनमध्ये एकही सामना गमावलेला नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून ब्रिस्बेनमधील विजयी घौडदोड कायम राखणार की टीम इंडिया इतिहास रचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संभावित टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल / पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | चौथ्या कसोटीआधी कांगारुंना मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

Aus vs Ind, 4th Test | ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी

(australia vs india 4th test match at brisbane preview)