Aus vs Ind, 4th Test | ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind, 4th Test | ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी
कर्णधार अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 4:51 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात चौथा कसोटी सामना 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळला जाणार आहे. या 4 सामन्यातील मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे या चौथ्या आणि शेवटचा सामना हा मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण या दोन्ही उभयसंघाची या मैदानातील कामगिरी पाहणार आहोत. (aus vs ind 4th test australia vs india head to head record in brisbane)

कांगारुंनी ब्रिस्बेनमध्ये आतापर्यंत कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. ब्रिस्बेन हा कांगारुंचा बालेकिल्ला राहिला आहे. कांगारुंनी ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे कांगारुंचा या मैदानावरील विक्रम फार चांगला आहे. तर टीम इंडियाचा या मैदानात विशेष अशी कामगिरी नाही.

भारताने आतापर्यंत या मैदानात ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी 5 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे.

कांगारुंची ब्रिस्बेनवरील कामगिरी

कांगारुंनी आतापर्यंत ब्रिस्बेनवर एकूण 55 कसोटी सामने खेळले आहेत. या 55 पैकी 33 सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला आहे. तर फक्त 8 कसोटींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे कांगांरुनी 1988 पासून या मैदानात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या मैदानात कांगारुंना वेस्टइंडिजकडून 1988 मध्ये अखेरचा कसोटी पराभव स्वीकारावा लागला होता.

वरील आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाचा या मैदानात तगडा रेकॉर्ड आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा सामना फार चुरशीचा होणार आहे. जो ही चौथी कसोटी जिंकेल तो संघ ही मालिका जिंकेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून ब्रिस्बेनवरील आपली विजयी मालिका कायम राखणार, की टीम इंडिया इतिहास घडवणार, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | चौथ्या कसोटीआधी कांगारुंना मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

(aus vs ind 4th test australia vs india head to head record in brisbane)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.