INDvsAUS : टर्नरने मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाचा भारतावर थरारक विजय

मोहाली: अॅश्टन टर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियासमोर तब्बल 359 धावांचं बलाढ्य लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. टर्नरने केवळ 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 83 धावा केल्या. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या …

INDvsAUS : टर्नरने मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाचा भारतावर थरारक विजय

मोहाली: अॅश्टन टर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियासमोर तब्बल 359 धावांचं बलाढ्य लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. टर्नरने केवळ 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 83 धावा केल्या. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 47.5 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पीटर हॅण्डस्कोम्ब, उस्मान ख्वाजा आणि अश्टन टर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हॅण्डस्कोम्बने 117, ख्वाजाने 91 धावा आणि टर्नरने 68 धावा केल्या.

या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तब्बल 193 धावांची सलामी दिली होती. रोहित शर्माने 95 तर शिखर धवनने 115 चेंडूत 143 धावा केल्या. तर रिषभ पंत 36 आणि विजय शंकरच्या 26 धावांमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

भारताच्या या धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंचला भुवनेश्वर कुमारने शून्यावर माघारी धाडलं. मात्र तिसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजाने या सामन्यातही 91 धावा ठोकल्या. पीटर हॅण्डस्कोम्बने झुंजार 105 चेंडूत 117 धावा ठोकल्या. हॅण्डस्कोम्बला चहलने माघारी धाडलं. यानंतर अंतिम षटकांमध्ये टर्नरने तुफानी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय मिळवता आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *