Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीपेक्षा 2 जास्त सिक्स मारुन मराठी मुलाने बनवला नवीन रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi : वनडे, t20 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या सिक्स मारण्याबद्दल तोड नाहीय. पण आता एका मराठी मुलाने त्याला मागे टाकलय. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या यूथ टेस्ट सीरीजमध्ये वैभव सूर्यवंशीने 7 सिक्स मारले होते.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीपेक्षा 2 जास्त सिक्स मारुन मराठी मुलाने बनवला नवीन रेकॉर्ड
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 24, 2025 | 1:17 PM

भारतीय क्रिकेटमध्ये सिक्स मारण्याच्या बाबतीत काय चालू आहे? जर तुम्ही असा प्रश्न विचारला, तर सगळ्यांकडे वैभव सूर्यवंशी हेच उत्तर असेल. पण तुम्ही वैभव सूर्यवंशीला विसरा. कारण त्याचा ओपनिंग पार्टनर, मित्र आणि टीम इंडियाच्या अंडर 19 चा कॅप्टन आयुष म्हात्रेने त्याच्यापेक्षा दोन जास्त सिक्स मारले आहेत. असं करताना त्याने नवीन भारतीय रेकॉर्ड बनवला आहे. इतकच नाही, अंडर 19 टेस्ट मॅचमध्ये आयुष म्हात्रे 200 पेक्षा जास्त धावा बनवणारा एकमेव भारतीय कर्णधार बनला आहे.

वनडे, t20 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या सिक्स मारण्याबद्दल तोड नाहीय. पण विषय टेस्टचा आल्यावर आयुष म्हात्रे अंडर 19 क्रिकेटमध्ये वैभवपेक्षा पुढे आहे. भारतीय सिनियर संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे तशीच अंडर 19 टीम सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध भारताची अंडर 19 टीम दोन टेस्ट मॅच खेळली. आयुष म्हात्रे या सीरीजमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज बनला आहे.

सिक्स मारण्याचा रेकॉर्ड बनवला

आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध 2 यूथ टेस्ट मॅचमध्ये एकूण 9 सिक्स मारले. यात 6 सिक्स एकाइनिंगमध्ये मारले. 9 सिक्ससह यूथ टेस्ट सीरीजमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी सौरभ तिवारीच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2007-08 सालच्या सीरीजमध्ये 8 सिक्स मारले होते.

वैभवला काय जमलं नाही?

मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या यूथ टेस्ट सीरीजमध्ये वैभव सूर्यवंशीने 7 सिक्स मारले होते. वैभवला सौरभ तिवारीचा रेकॉर्ड मोडता आला नव्हता. आता आयुष म्हात्रेने फक्त सौरभ तिवारीचाच रेकॉर्ड मोडलेला नाही, तर वैभव सूर्यवंशीपेक्षा 2 सिक्स जास्त मारलेत.

19 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

इंग्लंड विरुद्धच्या यूथ टेस्ट सीरीजमध्ये आयुष म्हात्रेने फक्त सर्वाधिक सिक्सच मारले नाहीत, तर कॅप्टन म्हणून यूथ टेस्ट सीरीजमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा आणि 200 प्लस धावा बनवणारा कॅप्टन बनलाय. 18 वर्षाच्या आयुष म्हात्रेला दुसऱ्या युथ टेस्टमध्ये हे यश मिळालं. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 80 आणि दुसऱ्यामध्ये 126 धावा करुन एकूण 206 धावा केल्या. आयुष म्हात्रेने या बाबतीत 19 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. याआधी हा रेकॉर्ड तन्मय श्रीवास्तवच्या नावावर होता. त्याने 2006 साली यूथ टेस्ट सीरीजच्या एका सामन्यात 199 धावा केल्या होत्या.