Babar Azam: आणि स्वत:ला विराट समजतो… बाबर आझमला ना स्पीड समजला, ना बाऊन्सर झेपला, Video Viral
Pak vs ENG Test Match: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मालिका सुरु असून या मालिकेतील पाकिस्तानच्या बाबर आझमचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

PAK vs ENG Test: इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची स्थिती बिकट पाहायला मिळाली. ३८९ धावांचे लक्ष्य गाठताना, पाकिस्तानची आघाडीची फळी इंग्लिश गोलंदाजांसमोर पूर्णपणे कोसळली. जोफ्रा आर्चरच्या एका धोकादायक बाउन्सरने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला इतके गोंधळात टाकले की, त्याला चेंडूचा वेग ओळखता आला नाही किंवा तो टाळण्यासाठी योग्य निर्णय घेता आला नाही. बाबर आझम अशा प्रकारे बाद झाला की त्याला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले. त्याच्या बाद होण्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी चाहते बाबरची तुलना नेहमीच विराट कोहलीशी करताना दिसतात. आता यानंतर मात्र पाकिस्तानी चाहते आणि बाबर यांना जोरदार ट्रॉल केले जात आहे.
पाकिस्तानच्या डावाच्या आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, आर्चरने एक अतिशय वेगवान आणि आखूड चेंडू टाकला. चेंडू उसळून थेट बाबरच्या दिशेने आला. चेंडूच्या वेगाने पूर्णपणे गोंधळलेला बाबर, तो खेळावा की सोडून द्यावा हे ठरवू शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला लागला, हँडलच्या जवळून गेला आणि हवेत उडून स्लिपच्या दिशेने जाण्यापूर्वी बाबरच्या हेल्मेटच्या वरच्या भागालाही लागला.
Jofra Archer delivered the short ball and Babar Azam delivered absolutely nothing, it’s Pavilion time for Ghante ka King 😅
Pakistan cricket team surrendering is nothing new. They are inspired by their military on how to surrender at crucial moments 😂pic.twitter.com/VgHkhG3c43
— Richard Kettlebourogh Fans (@RichKettle07) August 31, 2026
चौथ्या स्लिपमागे उभा असलेला जॉर्डन कॉक्स चेंडूच्या दिशेने वेगाने पुढे आला आणि त्याने सोपा झेल घेतला. अशाप्रकारे, बाबर आझमचा डाव अवघ्या ६ धावांत संपला. बाबरचा डाव अवघ्या ८ चेंडूंमध्ये संपला. पहिल्या डावातही बाबरने फलंदाजीत चांगली कामगिरी केली नव्हती, त्याने फक्त ८ धावा केल्या होत्या. बाबरचे शेवटचे कसोटी शतक २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आले होते. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये शतक झळकावून त्याला जवळपास ४ वर्षे झाली आहेत.
दुसऱ्या डावात पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. ऑली रॉबिन्सनने पहिले दोन बळी घेतले, त्यानंतर जोफ्रा आर्चरने कहर केला. पाकिस्तानने ७.१ षटकांत तीन फलंदाज गमावून केवळ १४ धावा केल्या. अझान अवैस अवघ्या ६ धावांवर ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेलबाद झाला. त्यानंतर अब्दुल्ला शफीकने आपल्या कामगिरीने निराशा केली आणि तो एकही धाव न काढता परतला. रॉबिन्सनने एकाच षटकात अवैस आणि शफीकला बाद केले.