AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त चिमुटभर मिठ, 5 मिनिटांत बरी होईल डोकेदुखी, जाणून घ्या रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आरोग्याच्या समस्या डोकंवर काढतात. अशात समस्यांपैकी एक म्हणजे डोकेदुखी... कामाचा व्याप, शरीरातील पाण्याची कमतरता... यांसारख्या कारणामुळे डोकेदुखी होऊ शकते... तर त्यावर मिठ कशाप्रकारे उपयोगी ठरु शकतो जाणून घ्या...

फक्त चिमुटभर मिठ, 5 मिनिटांत बरी होईल डोकेदुखी, जाणून घ्या रामबाण उपाय
| Updated on: Aug 31, 2026 | 9:54 AM
Share

अनेकांची एकच तक्रार असते आणि ती म्हणजे प्रचंड डोकं दुखत आहे. पण डोकेदुखीची कारणं अनेक असून शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता आणिसोडियमचं असंतुलन हे महत्त्वाचं कारण असू शकतं. अशात, अनेकांकडून असा देखील दावा करण्यात येत आहे की, मीठ आणि पाण्याच्या उपायाने डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. सांगायचं झालं तर, मिठाचा वापर फक्त स्वयंपाक करण्यासाठी नाही तर, वेगवेगळ्या कारणांसाठी देखील केला जातो.

मीठ आणि पाण्याचा उपाय काय आहे?

सतत डोकेदुखी होत असेल कर, तुम्ही घरात एक सोपा उपाय करु शकता. या उपायात, जिभेवर चिमूटभर मीठ ठेवून काही मिनिटांनंतर एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असा दावा केला जातो की, मिठातील सोडियम शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. पण, डोकेदुखी केवळ निर्जलीकरणामुळे किंवा सोडियमच्या कमतरतेमुळेच होते असे नाही.

वेदनाशामक (Pain Killer) औषधं घेण्यापूर्वी कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे: जेव्हा तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते, तेव्हा स्वतःहून सतत वेदनाशामक औषधे घेण्याऐवजी त्याचे कारण शोधून काढणे महत्त्वाचं आहे. डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते, ज्यात तणाव, झोपेचा अभाव, निर्जलीकरण, मायग्रेन यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर, थायरॉईडमुळे देखील अनेकांचं डोकं दुखतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी… असं देखील सांगितलं जातं. मीठाचं सेवन प्रत्येकासाठी योग्य नसतं. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना विशेषतः जास्त सोडियमचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे, डोकेदुखीसाठी नियमितपणे मीठ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे.

मिठामुळे फक्त डोकेदुखीच नाही तर, घशाच्या दुखण्यापासूनही आराम मिळू शकतो: कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील जळजळ आणि वेदनेपासून तात्पुरता आराम मिळू शकतो. तथापि, जर घशाचं दुखणं जास्त काळ टिकून राहिलं, ताप आला किंवा लक्षणं गंभीर असतील, तर वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा. कामाच्या गडबडीत कधीच आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका…

Follow Us
पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत
Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! सरकारसमोर नवं आव्हान काय?
tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज चर्चा, कोण कोण जाणार?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज मोठी चर्चा, कोण कोण जाणार?
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले