BBL 2020 | मॅकँजी हार्वेने घेतलेला शानदार कॅच पाहिलात का ?

| Updated on: Jan 02, 2021 | 11:00 AM

मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) विरुद्ध सिडनी थंडर्स ( Sydney Thunders) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात मॅकँजी हार्वेने हवेत झेपावत शानदार कॅच घेतला.

BBL 2020 | मॅकँजी हार्वेने घेतलेला शानदार कॅच पाहिलात का ?
मॅकँजी हार्वेने हवेत झेपावत घेतलेला शानदार कॅच
Follow us on

कॅनबेरा : क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. असाच एक अद्भूत प्रकार बीग बॅश लीगच्या 10 व्या मोसमात (BBL 10) पाहायला मिळाला. मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) विरुद्ध सिडनी थंडर्स ( Sydney Thunders) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात मॅकँजी हार्वेने (Mackenzie Harvey) हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. हार्वेने घेतलेल्या या कॅचसाठी त्याचं कौतुक केलं जात आहे. (bbl 10 melbourne renegades vs sydney thunders Mackenzie Harvey take super catch to alex hales)

पाहा अफलातून कॅच

सिडनीच्या बॅटिंगदरम्यानच्या चौथ्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मिचेल पेरी बोलिंग करत होता. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू होता. पेरीने फुलटॉस चेंडून टाकला. अॅलेक्स हेल्सने हा फुलटॉस चेंडू गलीच्या दिशेने फटकवला. हा चेंडू सीमारेषेवर जाणार असचं वाटत होतं. मात्र गलीमध्ये असलेल्या मेलबर्नचा फिल्डर मॅकँजी हार्वेने डावीकडे हवेत झेप घेत कॅच घेतला. त्यामुळे विरोधी संघातील खेळाडू आणि फलंदाज हेल्स आश्चर्यचकित झाले. हार्वेने घेतलेल्या या कॅचचे सर्वांनी कौतुक केलं.

कर्णधार फिंचकडून कौतुक

या कॅचनंतर मेलबर्नच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. कर्णधार एरॉन फिंचने तर हार्वेला जगातील सर्वोत्तम फील्डर म्हणूनच घोषित केलं.

कॅच ठरला वादग्रस्त

हार्वेने अफलातून कॅच घेतला. या कॅचसाठी त्याचं कौतुकही करण्यात आलं. मात्र यादरम्यान पंचांकडून फंलदाजाला बाद देताना एक चूक झाली. मिचेल पेरीने टाकलेला चेंडू हा नो बोल होता. हे पंचांच्याही लक्षात आलं नाही. हा चेंडू टाकताना पेरीचा एक पाय हा रेषेच्या पुढे होता. नियमांनुसार गोलंदाजी करताना पायाचा पाठचा भाग रेषेपुढे असल्यास तो नो बोल असतो. पंचाच्या चुकीचा फटता हा अॅलेक्सला बसला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला माघारी जावं लागलं. पंचाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

नो बोलकडे पंचांचं दुर्लक्ष

संबंधित बातम्या :

BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत

PHOTO | फिरकीपटू राशिद खानला धू धू धुतला, एका षटकात लुटल्या 24 धावा

(bbl 10 melbourne renegades vs sydney thunders Mackenzie Harvey take super catch to alex hales)