IND vs PAK : फायनलआधी पाकिस्तानला मिळू शकते वाईट बातमी, जास्त हुशारीमुळे एकाचवेळी दोघेही होतील OUT

IND vs PAK : भारतीय टीम विजयाच्या हॅट्ट्रिकसह आपला किताब वाचवण्यासाठी 28 सप्टेंबरला दुबईच्या मैदानात उतरेल. या फायनलआधी पाकिस्तानी टीमला मोठा झटका बसू शकतो.

IND vs PAK : फायनलआधी पाकिस्तानला मिळू शकते वाईट बातमी, जास्त हुशारीमुळे एकाचवेळी दोघेही होतील OUT
sahibzada farhan and haris rauf
Image Credit source: PTI/Francois Nel/Getty Images
| Updated on: Sep 26, 2025 | 1:42 PM

India vs Pakistan : आशिया कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदा भारत-पाकिस्तानच्या टीम रविवारी आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी याच टुर्नामेंटच्या दोन सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला वाईट पद्धतीने हरवलं आहे. भारतीय टीम विजयाच्या हॅट्ट्रिकसह आपला किताब वाचवण्यासाठी 28 सप्टेंबरला दुबईच्या मैदानात उतरेल. या फायनलआधी पाकिस्तानी टीमला मोठा झटका बसू शकतो. त्यांचे दोन प्रमुख खेळाडू हारिस रौफ आणि साहिबाजादा फरहानवर बॅन लागू शकतो. याचं एक मोठ कारण समोर आलय.

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया विरुद्ध मॅच दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आणि सलामीवीर साहिबाजादा फरहानने आक्षेपार्ह कृती केली होती. त्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला. याची तक्रार मॅर रेफरीकडे केली होती. या प्रकरणी आज शुक्रवारी 26 सप्टेंबरला सुनावणी होईल. या प्रकरणात दोन्ही खेळाडू दोषी आढळले तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते. कदाचित दोन्ही खेळाडूंना फायनलमध्ये सुद्धा खेळण्याची संधी मिळणार नाही.

प्लेन पाडल्याचा इशारा

आशिया कपच्या सुपर-4 राऊंडमध्ये 21 सप्टेंबरला दुबईत भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरा सामना झाला. ही मॅच टीम इंडियाने 6 विकेटने जिंकली. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याने बंदुकीसारखा इशारा केला होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने फिल्डिंग करताना प्लेन पाडल्याचा इशारा केला होता.

गन सेलिब्रेशनवर स्पष्टीकरण

BCCI ने याची तक्रार मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे केली. हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांचे व्हिडिओ सुद्धा मेलमध्ये अटॅच केले होते. या दरम्यान आपल्या गन सेलिब्रेशनवर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने स्पष्टीकरण दिलं होतं.

अचानक वाटलं सेलीब्रेशन करुया

आपल्या गन सेलिब्रेशनवर स्पष्टीकरण देताना साहिबजादा फरहान प्रेस कॉन्फ्रेसमध्ये म्हणाला होता की, “तो सेलिब्रेशनचा एक क्षण होता. मी फिफ्टी केल्यानंतर कधी सेलीब्रेशन करत नाही. पण अचानक मला वाटलं की, आज सेलीब्रेशन केलं पाहिजे. मी तेच केलं. मला माहित नाही की, लोक या गोष्टीला कसे घेणार? मला याची फिकिर नाही”

सूर्याविरोधात निर्णय आल्यास काय होईल?

BCCI अधिकाऱ्याच्या मते फरहानने जाणीवपूर्वक असं केलं. त्याने आधीच म्हटलय की, त्याला या बद्दल पश्चाताप नाहीय.आम्ही पूर्ण डोजियर बनवून मॅच रेफरी अँडी पायक्राफ्टला पाठवलं आहे. पीसीबीने केलेल्या तक्रारीनंतर 25 सप्टेंबरला सूर्यकुमार यादवची आयसीसीच्या एलिट पॅनलचे मॅच रेफरी रिचर्ड यांच्यासमोर सुनावणी झाली. रिपोर्ट्सनुसार, रेफरी 26 सप्टेंबरला अंतिम निर्णय सुनावतील. भारतीय कर्णधाराविरोधात निर्णय आल्यास वॉर्निंग मिळू शकते किंवा मॅच फी मधून काही रक्कम कापली जाईल.