IND vs BAN : अरेरे, प्रॅक्टिस मॅचमध्ये बांग्लादेशची ही हालत, भारताविरुद्ध काय होणार?
IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे. भारत आणि बांग्लादेश परस्पराविरुद्ध सामना खेळून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच प्रॅक्टिस मॅचमध्ये बांग्लादेशची वाईट अवस्था दिसून आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याने बांग्लादेशच्य़ा अभियानाची सुरुवात होणार आहे. 20 फेब्रुवारीला हा सामना आहे. मात्र, त्याआधी बांग्लादेश टीमची वाईट स्थिती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी झालेल्या सराव सामन्यात बांग्लादेशचा 7 विकेटने पराभव झाला. पाकिस्तानच्या शाहीन्स टीमने बांग्लादेशला पराभूत केलं. 17 फेब्रुवारीला ही मॅच झाली. बांग्लादेशची अशी हालत केली की, 50 सोडा 40 ओव्हर टिकणं सुद्धा कठीण बनलं.
पाकिस्तानच्या शाहीन्स टीम विरुद्धच्या वॉर्म अप मॅचमध्ये बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. त्यांची संपूर्ण टीम फक्त 38.2 ओव्हर्समध्ये 202 रन्सवर ऑलआऊट झाली. बांग्लादेशकडून कुठल्याही फलंदाजाने हाफ सेंच्युरी झळकवली नाही. मेहदी हसन मिराज 44 धावा करुन टीमचा टॉप स्कोरर राहिला. कॅप्टन सौम्य सरकारने 38 चेंडूत 34 धावा केल्या. तो टीमचा दुसरा टॉप स्कोरर ठरला.
त्याचा हा बेस्ट परफॉर्मन्स
पाकिस्तानच्या शाहीन्स टीमचा स्पिनर उसामा मीरने बांग्लादेशला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. दुबईच्या ग्राऊंडमध्ये त्याने बेस्ट वनडे परफॉर्मेन्स दिला. उसामा मीरने बांग्लादेश विरुद्ध वॉर्म अप सामन्यात 10 ओव्हरमध्ये 43 धावा देऊन 4 विकेट काढल्या. वनडे क्रिकेटमध्ये त्याचा हा बेस्ट परफॉर्मन्स आहे.
फलंदाजीत कोण चमकलं?
पाकिस्तानच्या शाहीन्स टीमसमोर विजयासाठी 203 धावांच टार्गेट होतं. हे लक्ष्य त्यांनी 34.5 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून पार केलं. म्हणजे 91 चेंडूआधी हा सामना जिंकला. गोलंदाजीत बांग्लादेश विरुद्ध उसामा मीरने चमक दाखवली, तर फलंदाजीत पाकिस्तानच्या शाहीन्सकडून मोहम्मद हॅरिसने चमकदार प्रदर्शन केलं.
टॉप स्कोरर कोण?
मोहम्मद हॅरिसने कॅप्टन इनिंग खेळत 73 चेंडूत 76 धावा केल्या. तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्यानंतर मुबासिर खान टीमचा दुसरा टॉप स्कोरर ठरला. त्याने नाबाद 65 धावा केल्या. या दोघांनी प्रॅक्टिस मॅचमध्ये बांग्लादेशची गोलंदाजी फोडून काढली.