IND vs SL : शुबमन गिलचा मित्र आहे म्हणून 62 विकेट घेणारा बॉलर टीममध्ये आणि रणजीत 162 विकेट घेणारा बाहेर, काय लावलय?

IND vs SL : आकडे आणि अनुभवाच्या बाबतीत आकिब टॉपला आहे. पण तरी त्याची टीममध्ये का निवड झाली नाही? हा मुख्य प्रश्न आहे. टीम इंडियाने त्याच्या मेहनतीचा अपमान केला. आगमी श्रीलंका कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे.

IND vs SL : शुबमन गिलचा मित्र आहे म्हणून 62 विकेट घेणारा बॉलर टीममध्ये आणि रणजीत 162 विकेट घेणारा बाहेर, काय लावलय?
Captain Shubman Gill
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 28, 2026 | 3:28 PM

मेहनतीचं चांगलं फळ जरुर मिळतं. पण ही गोष्ट वेगवान गोलंदाज आकिब नबीला लागू होत नाही. आकिब नबीने रणजी ट्रॉफीमध्ये 60 पेक्षा जास्त विकेट काढलेत. लाल चेंडूने कमालीच प्रदर्शन करत जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीत विजय मिळवून दिला. पण टीम इंडियाने त्याच्या मेहनतीचा अपमान केला. तोच आता मोठा मुद्दा बनला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. त्यात आकिब नबीला स्थान मिळालेलं नाही. पण शुबमन गिलचा जवळचा मित्र गुरनूर बराडचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

गुरनूर बराडचा टीम इंडियात कसा समावेश झाला? त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असं काय केलय की त्याला टेस्ट टीममध्ये स्थान मिळालं? आकिब नबीला इतक्या चांगल्या प्रदर्शनानंतरही का संधी मिळत नाहीय? गुरनूर बराडला शुबमन गिलसोबत असलेल्या मैत्रीचा फायदा मिळतोय का? गुरनूर बराडच्या टॅलेंट बद्दल प्रश्नच नाही. पण आकिब नबीने अशी काय चूक केली की, त्याला अफगाणिस्तान विरुद्ध टेस्ट मध्ये बेंचवर बसवून ठेवण्यात आलं. मग संधी न देता टीम बाहेर केल?

तुलना केली तर दोघांमध्ये जमीन-आसमानचं अंतर

आकिब नबी आणि गुरनूर बराड यांच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरीची तुलना केली तर त्यात जमीन-आसमानचं अंतर आहे. गुरनूर बराडने 19 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 62 विकेट काढलेत. यात आकिब नबीच्या नावावर 43 सामन्यात 162 विकेट्स आहेत. आकिब नबीची गोलंदाजी सरासरी फक्त 18.63 आहे. गुरनूरचा बॉलिंग सरासरी 25.24 आहे. आकडे आणि अनुभवाच्या बाबतीत आकिब टॉपला आहे. पण तरी त्याची टीममध्ये का निवड झाली नाही? हा मुख्य प्रश्न आहे. शुबमन गिल भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन आहे.

श्रीलंका टेस्ट सीरीजसाठी टीम इंडिया

शुबमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत, यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरैल, देवदत्त पडिक्कल, मानव सुथार, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड आणि सारांश जैन

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us