गीता समोताने रचला इतिहास, आफ्रिकेतील 16000 फूट उंच किलीमंजारो शिखर सर्वात जलद सर करण्याचा विक्रम

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला कर्मचारी गीता समोता यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो (5,895 मीटर) चढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

गीता समोताने रचला इतिहास, आफ्रिकेतील 16000 फूट उंच किलीमंजारो शिखर सर्वात जलद सर करण्याचा विक्रम

मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला कर्मचारी गीता समोता यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो (5,895 मीटर) चढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गीता समोता या आफ्रिकेतील किलिमंजारो पर्वतावर सर्वात जलद चढणाऱ्या भारतीय ठरल्या आहेत. गीता समोता यांनी 16,000 फूट उंचीवर भारताचा तिरंगा फडकवून इतिहास रचला आहे. (CISF Official Geeta Samota successful summit of Mount Kilimanjaro highest peak Africa)

किलिमंजारो पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 5,895 मीटर इतकी आहे. हा जगातील सर्वात उंच मुक्त पर्वत आहे आणि किलिमंजारो पर्वताच्या शिखरावर तीन ज्वालामुखी शंकू आहेत. याआधी आंध्र प्रदेशातील ऋत्विका या नऊ वर्षांच्या मुलीनेही या पर्वतावर चढाई केली होती. ऋत्विका किलिमांजारो चढणारी सर्वात लहान आशियाई मुलगी आहे.

किलीमंजारो शिखर हे पृथ्वीवरील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. वैज्ञानिक अभ्यासानंतर एक इशारा जारी केला आहे की 2050 पर्यंत, पर्वत सौंदर्य हिमखंड आणि ग्लेशियर गायब होतील कारण ओझोनच्या थरात भेगा पडलू लागल्या आहेत.

विक्रम प्रस्थापित केल्यानंतर गीता समोता म्हणाल्या की, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव करून द्या. महिलांची शक्ती आफ्रिकेच्या शीर्षस्थानी चमकत आहे, ज्यामुळे भारत आणि सीआयएसएफच्या महिलांना अभिमान वाटतोय.

सीआयएसएफच्या उपनिरीक्षक गीता समोता यांनी गेल्या महिन्यात रशियातील एलब्रस पर्वतावर चढाई केली होती. जे युरोपमधील सर्वात उंच शिखर आहे. यासह गीता समोता या अशी कामगिरी करणाऱ्या CISF च्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

इतर बातम्या

Manchester Test : ‘त्या’ रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं

इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?

IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार

(CISF Official Geeta Samota successful summit of Mount Kilimanjaro highest peak Africa)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI